Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

मर्दानं मर्दासारखं लढावं; CM उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला -उद्धव ठाकरे

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: कुस्तीसाठी भाजप उतरला तर स्पर्धेआधी धाडी टाकतील. कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आहे.मर्दाने मर्दासारखं लढावं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या शिवसैनिकांशी संवाद साधताना भाजपवर टीकास्त्र सोडले. काल सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस आले होते तेव्हा त्यांनी महाविकासआघाडी वर निशाणा साधला याला प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी आज दिले.

कोल्हापूर भगव्याचा बालेकिल्ला आहे.मर्दाने मर्दासारखं लढावं.

ते म्हणाले,आम्ही शिवरायांचे मर्द मावळे आहोत. खोटं बोलणे आमच्या रक्तात नाही. आम्ही खोटं बोलण्यात कमी पडतो पण खोटं बोलणं रक्तात नाही असाही टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, भाजपाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जनतेच्या साक्षीने मला विचारू द्या. आमच्या कामात कुठं खोटं असेल तर जनतेसमोर आमचा पर्दाफाश करू देत असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी भाजपाला दिले. महाविकास आघाडी खोट बोलत नाही. आम्ही उघडपणे सर्व करतो, काळोखात काही करत नाही. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतला नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असाही घणाघात ठाकरेंनी केला.भाजपाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीमागून वार करत नाही.खरं करून दाखवण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी शिवसेनेची आहे. भाजप सोबतची युती आम्ही तोडली नाही भाजपान तोडली असेही ते म्हणाले.

कोल्हापूरकरांनी भगवा अबाधित ठेवला असं म्हणत कोल्हापूरकरांचे आभार मानले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवलेल्या पृथ्वीराज पाटील यांचंही कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! २९ ऑगस्टचे उपोषण अंतरवाली सराटीतच, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे कूच

IIT Roorkee Report on Almatti Dam : सांगली-कोल्हापूर महापुराला आलमट्टीच जबाबदार! 'रुरकी आयआयटी'च्या अहवालानंतर कोर्टात जाण्याची तयारी, कर्नाटकाच्या मनमानीचा पर्दाफाश?

Ramdas Athawale: अभिजित दीपके यांना रामदास आठवलेंचे RPIत येण्याचे निमंत्रण; ‘सुशिक्षित युवा नेतृत्वाची गरज’

Latest Marathi News Live Update : फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; पाच जण जखमी

Amit Thackeray: ‘रस्त्यात डांबर, पेव्हर ब्लॉक अन् काँक्रीटचा पॅच; हा कसला विकास?’ अमित ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

SCROLL FOR NEXT