uddhav thackeray criticize rebel political leaders change political party Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : गद्दारांना धडा शिकवा; उद्धव ठाकरे यांचे आवाहन; सत्तेसाठी बदलला पक्ष

‘‘पक्षात असताना त्यांना जे देता येईल ते सगळे दिले. तरीही त्यांनी आमच्या पाठीत वार केला. येथील गद्दार खासदाराची तरी काय ओळख होती?

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : ‘‘पक्षात असताना त्यांना जे देता येईल ते सगळे दिले. तरीही त्यांनी आमच्या पाठीत वार केला. येथील गद्दार खासदाराची तरी काय ओळख होती? पण, शिवसेना हे नाव घेऊन तो तुमच्यासमोर आला. म्हणून, तुम्ही त्याला दोन वेळा निवडून दिले.

पण, आता त्या गद्दाराला आणि सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनाही धडा शिकवावा लागणार आहे‌,’’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मावळ लोकसभा मतदार संघात सोमवारी (ता. ४) उरण येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार बारणे यांचे नाव न घेता त्यांना उद्देशून इशारा दिला.

तसेच लोकसभा संघटक संजोग वाघेरे हे मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आहेत, असेही त्यांनी जाहीर केले. यावेळी, पनवेल येथील वाघेरे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले.

सभेला झालेली गर्दी पाहून ठाकरे म्हणाले,‘‘मावळ लोकसभेची जागा आपणच यापूर्वी जिंकलो व येत्या काळातही आपणच जिंकणार आहोत. मावळ हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान; तर रायगड ही छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी आहे.

छत्रपतींच्या जिल्ह्यांमध्ये आपला हक्काचा भगवाच फडकवणार आहोत. भाजप हा पक्ष नाही. ही एक भ्रष्टाचारी, सडकी, कुजकी वृत्ती आहे. ही वृत्ती देशातून संपवावी लागेल. देशातून ही वृत्ती तडीपार करावी लागेल, तरच अच्छे दिन येतील.’’

मतदारसंघाचे प्रश्न तडीस लावू : संजोग वाघेरे

पनवेल येथील सभेत बोलताना मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील म्हणाले, ‘‘२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी ज्यांनी विकासकामांचे आश्वासन दिले होते. त्यांनी एकही काम मतदारसंघात केलेले नाही.

पनवेल शहरात पाण्याची समस्या आहेच, परंतु या ठिकाणी एकही आरोग्य केंद्र, रुग्णालय नाही. अनेक प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जण काम करणार आहोत. सर्वांनासोबत घेऊन मतदारसंघातील प्रश्न मार्गी तडीस लावू. माझ्याकडे मावळ लोकसभा मतदारसंघात संघटक म्हणून जबाबदारी दिली. ती जबाबदारी मिळाल्यानंतर आपण मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! 'साेलापुरात आयटीपार्कसाठी उद्याेजकच जागा निवडणार'; हैदराबाद, पुण्यातील उद्योजकांचा लवकरच दौरा

Ganeshotsav 2025: गणपतीची सोंड उजवी की डावी? शास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या!

Dog Rescue: ‘ती’ने पिलांना काढले मृत्यूच्या दाढेतून बाहेर; पहाडसिंगपुऱ्यात ‘श्वान परिवारा’च्या मदतीसाठी सरसावले स्थानिकांचे हात

World Archery 2025: महाराष्ट्राच्‍या गाथा खडके, शर्वरी शेंडेला ब्राँझ; जागतिक तिरंदाजी स्पर्धा, भारतीय खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी

IndiaA VS AustraliaA: चारदिवसीय लढतीत भारत अ संघाचा पराभव; यजमान ऑस्ट्रेलिया अ संघाची बाजी

SCROLL FOR NEXT