devendra fadanvis sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: 'देवेंद्रजी, तुमच्या परिवाराचे व्हॉट्सअप चॅट…,तर तुम्हाला शवासन करावं लागेल', ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

परिवार तुम्हालाही आहे, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

अंकिता खाणे (Ankita Khane)

भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशातील जवळपास १५ पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते काल पाटण्यात एकत्र आले होते. या बैठकीला अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, ममता बॅनर्जी, भगवंत मान प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, लालूप्रसाद यादव, ओमर अब्दुल्ला, महेबुबा मुफ्ती, हेमंत सोरेन व इतर प्रमुख नेते उपस्थित होते यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षांवर टीका केली त्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

काल विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, हे परिवार बचाव बैठकीला गेले आहेत. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देवेंद्रजी एवढ्या पातळीवर येऊ नका परिवार तुम्हाला देखील आहे. तुमच्या परिवाराचे व्हॉटसअप चॅट बाहेर आले आहेत, बाहेर येत आहेत. आम्ही अजून त्यावर बोललो नाही. आम्ही जर तुमच्या परिवरावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल, वेगळी कोणती आसन तुम्हाला झेपणार नाहीत, फक्त पडून राहावं लागेल असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

तर पुढे ठाकरे म्हणाले की, 'आम्ही बोललो तर तुम्हाला झेपणार नाही त्यामुळे तुम्ही आमच्या परिवरावर बोलू नका, मी माझ्या परिवारासाठी मी फार संवेदनशील आहे आणि जमलेला प्रत्येकजण माझा परिवार आहे. सर्व शिवसैनिक माझा परिवार आहे, संपुर्ण महाराष्ट्र माझा परिवार आहे, त्यामुळे माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दूसरा कोणी घेत असेल तर तुमचं तुम्हाला माहिती, पण माझं कुटुंब माझी जबाबदारी आहे मी माझ्या कुटुंब जपणार आहे. हे माझं कुटुंब माझ्या सोबत आहे असंही ते पुढे म्हणालेत.(Latest Marathi News)

त्यामुळे परिवार बचाव वगैरे बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत असंही ते म्हणाले आहेत. तर देश भाजपच्या हातातून कधीच सुटला आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही खलनायक म्हणता पण मी नायक की खलनायक आहे हे जनता ठरवेल परंतु तुम्ही नालायक आहे हे जनतेला माहिती आहे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT