Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: ''सोडून गेलेले काही आमदार तिथेच राहून मदत करणार...'' दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Dharavi Project: धारावी प्रकल्पाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणी काय भूमिका घ्यावी, ते मला माहिती नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. धारावीकरांना तिथेच घर मिळालं पाहिजे.. मी विकासाआड नाही. परंतु धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवायचं आणि एका धारावीच्या वीस धारावी करायच्या, हे मला मान्य नसून मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही.

संतोष कानडे

Uddhav Thackeray Delhi Tour: उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी इंडिया आघाडीतील काही नेत्यांना भेट दिली. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बांगलादेशवरील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायवर भाष्य केलं. तसेच मुंबईतल्या धारावी विकास प्रकल्बाबाबतही भूमिका स्पष्ट केली.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बांगलादेशमध्ये जनता रस्त्यावर उतरली आहे. इस्रायल, बांगलादेश आणि श्रीलंकेमध्ये जनतेने उठाव केला. त्यामुळे जनतेच्या सहनशीलतेचा कधी अंत पाहू नये. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असतील आणि ते खरे असतील तर केंद्र सरकारने याबाबत पावलं उचलणं गरजेचं आहे.. नाहीतरी सध्या अधिवेशन सुरुच आहे.

ठाकरे पुढे म्हणाले म्हणाले की, बांगलादेशच्या मुद्द्यावर सर्वपक्षिय बैठक गृहमंत्र्यांनी बोलावली होती. नुसती माहिती त्या बैठकीत देण्यात आलेली आहे.. इकडे मणिपूर पेटलेलं आहे, काश्मीरमध्ये हिंदूंच्या हत्या झालेल्या आहेत.. केंद्राने पावलं उचलून हे थांबवायला पाहिजे. शेख हसीना यांना तुम्ही आसरा देत असाल तर हिंदूंना आश्रय देण्याची जबाबदारी तुमचीच आहे.

धारावी प्रकल्पाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोणी काय भूमिका घ्यावी, ते मला माहिती नाही. माझी भूमिका स्पष्ट आहे. धारावीकरांना तिथेच घर मिळालं पाहिजे.. मी विकासाआड नाही. परंतु धारावीतल्या लोकांना अपात्र ठरवायचं आणि एका धारावीच्या वीस धारावी करायच्या, हे मला मान्य नसून मी मुंबईची विल्हेवाट लावू देणार नाही.

सोडून गेलेले आमदार आणि नेते यांच्या परतीचे दोर कापले आहेत की त्यांना माघारी येता येईल? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, सोडून गेलेल्यांनी यावंच असं काही नाही. त्यातल्या काहींनी तिथेच राहून मदत केली तर काय प्रॉब्लेम.. मी असंच होईल असं म्हणत नाही परंतु शक्यता बघतोय, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नवीन मुद्द्याला हात घातला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : मोदी सरकारचे काम चांगले, पेपरफुटीविरोधी विधेयकावर सोनम वांगचुक खूश; विध्यार्थ्यांवरील कारवाईवरही बोलले

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेला वेग! 2027 च्या अंतराळ मोहिमेसाठी इस्रोची मोठी तयारी, अंतराळवीर अवकाशात झेप घ्यायला सज्ज

Akola News: अकोल्यात 'शोले स्टाईल' आंदोलन! सीईटी-एमपीएससी कथित पेपरफुटीवर संताप; जलकुंभावर चढून युवक काँग्रेसचा सरकारला इशारा

Latest Marathi News Live Update : रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड

High Court Judgment: उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय! सज्ञान युवतीला आवडीचा जोडीदार निवडण्याचा अधिकार; पतीसोबत राहण्याची इच्छा मान्य

SCROLL FOR NEXT