Ramdas Athawale esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramdas Athawale : ठाकरे-फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी फोडले ही मनातील चीड उद्धव ठाकरे यांनी काढून टाकावी.

मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट - ‘महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस वाद सुरू आहेत. राजकारणात विरोधकदेखील असतात. माझी दोघांनाही विनंती आहे की, दोघेही राजकारणात राहा. राजकारणात दोघेही राहतीलच. शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांना फडणवीस यांनी फोडले ही मनातील चीड उद्धव ठाकरे यांनी काढून टाकावी.

पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र यांच्यातील वाद मिटला नाही तर मुख्यमंत्रीपदी मी असेल, असे विधान केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरात मातंग समाज समन्वय समिती, पुणे यांच्यातर्फे अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय समाजकल्याण मंत्री आठवले यांनी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समाजमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर फडणवीस ही आनंदाची बाब

‘महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. त्या सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नितीन गडकरींचा नंबर लागला होता. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा विचार होतोय. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली, तर आनंदाची गोष्ट आहे, असेही खासदार आठवले यांनी सांगितले.

अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ ची मागणी

लोकशाही अण्णा भाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अण्णा भाऊंना भारतरत्न मिळण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असून, लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

''भारत शांततेवर विश्वास ठेवतो, पण...''; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती मुर्मूंचं देशवासीयांना संबोधन

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

Manchar News : ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा! मंचरला ‘टॉपकॉन ट्रायटन’ मशीनद्वारे रेटिना व सूक्ष्म रक्तवाहिन्यांचे अचूक पद्धतीने होणार परीक्षण

SCROLL FOR NEXT