Sharad Pawar Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : "उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही"

चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

वैष्णवी कारंजकर

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी गौतम अदानी प्रकरण आणि त्याबद्दलच्या आपल्या विधानाबद्दलही भाष्य केलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवारांच्या या विधानाबद्दलचं वृत्त एबीपी माझाने दिलं आहे. या वृत्तानुसार, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरेंनी सहकारी पक्षांना विचारात घेतलं नाही, त्यांनी इतर पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

पवार म्हणाले, "मुख्यमंत्रीपद तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्या संख्येवरुन ठरलं होतं. यामध्ये तिन्ही पक्ष सहभागी होते. जर कोणाला वेगळा निर्णय घ्यायचा असेल, राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद करणं गरजेचं होतं. चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT