uddhav thackeray faction and vanchit bahujan aghadi prakash ambedkar join hands maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : भाजपविरोधात फॉर्म्युला ठरला! शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार

सकाळ डिजिटल टीम

शिवसेनेते पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे गट आणि वंचित एकत्र येणार आहे. भाजपविरोधात ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडी युती करणार असून वंचितकडून यासाठी होकार देण्यात आल्याची माहिती वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वी एका मंचावर आले होते, त्यानंतर युतीच्या चर्चांना उधाण आले होते.

शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याच्या भूमिकेमध्ये एकमतावर आले आहेत, आम्ही सकारात्मक आहोत. बोलणी पुढे गेली असून वंचितच्या तीन प्रतिनिधींची सुभाष देसाईंसोबत दोन बैठका घेतल्या आहेत. बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. सुभाष देसाई दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांना भेटले आहेत, त्यांच्यात देखील सकारात्मक चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमात भेटले त्यांच्यामध्ये देखील सकारात्मक चर्चा झाली असे रेखा ठाकूर यांनी सांगितले.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT