Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : 'शिवसेनेच्या डीएनएमध्ये असं ढोंग नाही, भीष्म पितामह यांच्याकडून तरी...'; ठाकरे गटाचा शरद पवारांवर निशाणा

रोहित कणसे

राज्यात आगामी निवडणूकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. यादम्यान महाविकास आघाडीत मात्र धुसफूस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवारांशी गुप्त बैठक केली. या बैठकीवरून मविआमधील घटकपक्ष उद्धव ठाकरे गटाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला आहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व अजित पवार यांची एका उद्योगपतीच्या निवासस्थानी बैठक झाली होती. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मातोश्रीवर आले होते. येथे त्यांची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत परवा झालेल्या दोन नेत्यांच्या बैठकीवर चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात संभ्रमाचं वातावरण तयार होतं आहे याबद्दल देखील या भेटीत चर्चा झाली.

शरद पवार म्हणाले, अजित पवार पुतणे आहेत. असू शकतात. रोहित पवारांचं वक्तव्य ऐकलं. नातीगोती सांभाळायची असतात, असं रोहित पवार म्हणाले. मग कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती का लढायचं? हा प्रश्न आहे. उद्या आम्ही जर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चहा प्यायला बसायला लागलो, आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचं आणि कार्यकर्त्यांनी मग विचारधारेसाठी एकमेकांविरोधात लढायचं. मला वाटतं शिवसेनेच्या डीएनए मध्ये असं ढोंग नाही. ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. महाभारताप्रमाणे आहे. मग स्वकीय असतील नातीगोती असतील आम्हाला त्याची पर्वा नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी शरद पवार याना सुनावलं.

लोकांच्या मनात संशय आणि संभ्रम येईल असं नेतृत्व निदान भीष्म पितामह यांच्याकडून तरी होऊ नये. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही लढणारे लोकं आहोत. नातीगोती, प्रेम घरामध्ये. आमच्यासमोर आव्हान उभं केलं गेलं आहे. चुकीच्या लोकांशी हातमिळवणी करून कोणी हातमिळवणी करत असेल तर ते आमचे नातेवाईक नाहीत, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT