Uddhav Thackeray  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंकडे बेहिशोबी मालमत्ता? भिडेंच्या दाव्यावर आज हायकोर्टात सुनावणी

उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केलाय

सकाळ डिजिटल टीम

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरची आज सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली आहे.

ठाकरेंच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी या याचिकेतुन गौरी भिडे आणि त्यांच्या वडिलांनी केली आहे. ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी. आता त्यांच्याकडे जितकी संपत्ती आहे याचा हिशोब लागत नाही असा आरोप भिडे यांनी केला आहे.

हे ही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमकं स्त्रोत काय? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता, तर साडे अकरा कोटी रुपये नफा कसा झाला? ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी गौरी भिडे या याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक लढवली होती. तर उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर आमदार म्हणून गेले, त्यामुळे उद्धव ठाकरे कुटुंबाला त्यांच्या संपूर्ण संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून सादर करावी लागली होती.

उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती किती?


जवळपास 125 कोटींची संपत्ती

शेअर्समध्ये 22 कोटींची गुंतवणूक

उत्पन्नाचं स्त्रोत शेअर्समधून येणारा डिव्हिडंट

1 कोटी 61 लाखांची एफडी

मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरं

बाजार भावानुसार घराची किंमत 52 कोटी

कर्जतमध्ये एक फार्म हाऊस

23 लाखांची ज्वेलरी

एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक

3 एकर जमीन, भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड

बाजारभावानुसार जमिनीची किंमत 5 कोटी

जमीन : मुरशेट, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर

बाजारभावानुसार जमिनीची किंमत 14 कोटी

बँकेचं कर्ज 4 कोटी

रश्मी ठाकरे यांची संपत्ती

35 लाखांची एफडी

शेअर्स आणि बॉण्डमध्ये 34 कोटींची गुंतवणूक

एनएसएसमध्ये 3 लाखांची गुंतवणूक

1 कोटी 35 लाखांची ज्वेलरी

जमीन : भिलवले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड

जमीन : वैजनाथ, तालुका कर्जे, जिल्हा रायगड

जमीन : हुमगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड

जमीन : कोरलाई, तालुका मुरूड, जिल्हा रायगड

जमिनीची एकूण किंमत 6 कोटी

घराची बाजारभावानुसार किंमत 30 कोटी

बँकेचं कर्ज 11 कोटी

आदित्य ठाकरे यांची संपत्ती

एफडीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक

शेअर्स आणि बॉण्डमध्ये 20 लाखांची गुंतवणूक

65 लाखांची ज्वेलरी

जमीन : बिलावले, तालुका खालापूर, जिल्हा रायगड

बाजारभावानुसार जमिनीची किंमत 77 लाख रुपये

व्यावसायिक इमारत, श्रीजी आर्केड, ठाकुर्ली, कल्याण

बाजारभावानुसार किंमत 4 कोटी

एनएसएसमधील गुंतवणूक 3 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT