Uddhav Thackeray Hingoli Sabha 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray Hingoli Sabha: नाग समजून पूजा केली पण तो डसला, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता संतोष बांगरांवर हल्ला

Sandip Kapde

Uddhav Thackeray Hingoli Sabha:  शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पाऊस पडूदे अशी प्रार्थना केली. त्यांनी शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. 

मी गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. काही जणांना वाटत असे मी त्यांच्यावर बोलेल. पण मी बोलणार नाही. गद्दाराला नांग समजून पूजा केली पण त्यांनी आपल्यावर फणा काढला. या गद्दारांना जनता जागा दाखवेल. कोणी उद्धटपणा केल्यास त्यांना त्यांची जागा दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


सरकार आपल्या दारी, थापा मारी लय भारी, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर केली. परभणीत आज शिंदे सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आहे. शेतकरी हवालदिल आहे. पण सरकार फिरण्यात व्यस्त आहे.  गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांचे भलं केलं असतं, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेनेच्या मागे उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकुळ्यांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आहे. मागे नागपंचमी झाली, या गद्दाराची नाग समजून आपण पूजा केली पण तो उलटा फिरून डसायला लागला. त्यामुळे तो पायाखाली आला तर काय करायचे हे तुम्हाला चांगल माहिती आहे. याच्यासाठी पुंगी वाजवली, त्याला दुध दिलं, पण हे सर्व वाया गेलं. मटक्याचे धंदे करणारा हिंदुत्व कसा असू शकतो का?, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांचे नाव न घेता केली. (latest marathi news)

उद्धव ठाकरेंचा बीआरएसला टोला

काहीजण बाहेरच्या राज्यातून आले आहेत. जसं की महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा कोणी वाली नाही. त्यांच्या भाषेत आणि आपल्या भाषेत फरक आहे. गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांचे भलं केलं असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT