Milind Deora sakal
महाराष्ट्र बातम्या

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - काँग्रेसमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रचंड दबाव टाकल्याने काँग्रेसने ही जागा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सोडली. त्यामुळेच आपल्याला काँग्रेस सोडावी लागली, असे देवरा यांनी स्पष्ट केले.

‘काँग्रेस माझ्यासाठी आता भूतकाळ आहे. मला आता भविष्याकडे बघायचे आहे. त्यामुळे कुठेही घालमेल नाही. काही संदेश नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला संधी दिली आहे. मला राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले आहे. त्यामुळे मी फार आनंदी आहे.

शिवसेनेच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार यामिनी जाधव या ‘फायटर’ आहेत. त्या नक्कीच निवडून येतील. याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही,’’ असा विश्वास मिलिंद देवरा यांनी व्यक्त केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अरविंद सावंत निवडून येणार नाहीत. त्यांचा कुठलाही जनसंपर्क नाही. त्या भागात कधी फिरत नाहीत, असेही देवरा म्हणाले.

गेल्या ४५ वर्षांत कायम देवरा कुटुंबीयांचेच नाव मतपत्रिकेवर असायचे. यावेळी पहिल्यांदा कुटुंबाच्या सदस्यासाठी मतदान केले नाही तर मी शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मत दिले. पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी मी मत दिले.

- मिलिंद देवरा, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT