Uddhav Thackeray News 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray News: "भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो, पण..." ; उद्धव ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Sandip Kapde

Uddhav Thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांची जय्यत तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या बैठकांवर बैठका होत आहे. उद्धव ठाकरे सर्व मतदारसंघांचा आढावा घेत आहेत. दरम्यान शिवसेना पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. साम टीव्हीने याबाबत माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी भाजपसोबत पॅचअप करू शकलो असतो. पण ते माझ्या नितीमत्तेत बसत नव्हतं. कारण स्वाभिमान महत्वाचा होता. शिवसेनेचा दरारा कायम राखणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी कोणतीही तडजोड केली नाही. (latest marathi news)

ज्यांनी 2014 पासून आपल्याला फसवलं, 2014 विधानसभा, 2017 मुंबई महापालिका आणि 2019 मातोश्रीत दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द नाही पाळला नाही. त्यांच्यासोबत कसे काय जाणार?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना डांबून ठेवू शकलो असतो. पण जे मनाने फुटले होते त्यांना डांबून काय करणार? त्यांना मी काय कमी केलं?. जुने निष्ठावंत पक्ष सोडून जातात त्याचे वाईट वाटते. तुमच्या पैकी कुणाला जायचे असेल तर खुशाल जाऊ शकता. संकटं येतात, संकटं जातात. मी खंबीर आहे.

पुन्हा सत्तेत येणार-

आपण पुन्हा सत्तेत येणार. माझा काही स्वार्थ नाही. मला निवडणूक लढवायची नाही. तुम्ही निवडणूक लढवता, निवडून येता. पक्ष-कार्यकर्ते तुम्हाला मोठे करतात आणि मग मोठे झाल्यावर तुम्ही पक्ष सोडून जाता, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT