Shivsena Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena : 'धनुष्यबाण' चिन्हासंदर्भात मोठी घडामोड; दिल्ली उच्च न्यायालयात ठाकरेंची धाव

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. यासंदर्भात आज मोठी घडामोड घडली असून दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली. शिवसेनेतले ४० आमदार शिंदे गटामध्ये सामील झाले. त्यानंतर झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये खरी शिवसेना कुणाची हा पेच निर्माण झाला होता.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव दिलं. तर ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळालं. हा तात्पुरता निर्णय होता. त्यामुळे ठाकरे गटाकडून नावासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात वाद सुरुच आहे.

हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

दरम्यान, दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत निर्णय देण्यापूर्वी ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयात कोर्टाने हस्तक्षेपासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यावरील सिंगल बेंचच्या कोर्टाने अशा हस्तक्षेपाला नकार दिला होता.

सिंगल बेंचच्या या आदेशाला उद्धव ठाकरे यांनी आज दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे. निवडणूक आयोग्याच्या आदेशात हस्तक्षेप करुन योग्य तो निर्णय व्हावा, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT