Uddhav Thackeray on Ed raids Shivsena Leader Sanjay Raut Residence maharashtra news  
महाराष्ट्र बातम्या

राऊतांवरील ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. आता या चौकशीला जवळपास आठ तासापेक्षा अधिक काळ झाला आहे. दरम्यान पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांच्यावर अटकेची टागंती तलवार कायम आहे. यादरम्यान दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले की, संजय राऊतांना आज कदाचीत अटक होण्याची शक्यता आहे, आज त्यांनी रोखठोक केलं आहे. हे कारस्थान निर्लज्जपणे चाललं आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंदुत्व हा शब्द बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस नव्हते तेव्हा देशात शिवसेनाप्रमुख हा एकमेव मर्द होता असे, उद्धव ठाकरे म्हणाले.अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला होता तेव्हा हे सगळे कुठं होते. यांची नामोनिशाणीतरी होती का? असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आता यांना हिंदुत्वाचा पुळका आलेला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. गेल्या ८ तासांपासून ईडीकडूनपत्राचाळ प्रकरणी ही चौकशी सुरु आहे.दरम्यान ईडीने यापूर्वी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावलं होतं. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण देत संजय राऊत हे चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. दरम्यान, भांडुप येथील त्यांच्या राहत्या मैत्री या घरी सकाळी ईडीचे अधिकारी आले होते. सकाळपासून आत्तापर्यंत त्यांची कसून चौकशी चालू होती. यादरम्यान त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले असून जोरदार घोषणाबाजीला सुरूवात केली होती. पण अखेर राऊतांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT