Eknath Shinde - Uddhav Thackeray Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'हेच आपलं शेवटचं आव्हान', उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलं थेट चॅलेंज

संतोष कानडे

मुंबईः शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे. मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या वतीने कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. ठाकरे गटाचा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेला होता. उद्धव ठाकरे यांनी जोरदारपणे भाजप आणि एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं.

सुरुवातीला उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आपल्या शिवसेनेला ५७ वर्षे पूर्ण झालेली आहेत. अजूनही तोच जल्लोष, ताकद, हिंमत जशीच्या तशीच आहे. इकडे निष्ठावंतांची गर्दी आहे, तिकडे गारद्यांची गर्दी आहे. आम्हांला म्हणतात, सुर्यावर थुंकू नका.. परंतु तुमचा सुर्य तिकडे मणिपूरमध्ये का उगवत नाही? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. मणिपूरमध्ये सीरियासारखी परिस्थिती झालेली आहे. डबल इंजिनचं सरकार नुसतं वाफा सोडत आहे, असंही ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांवर टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल फडणवीसांनी हास्यजत्रेचा प्रयोग सादर केला. त्यात त्यांनी आज आपण जिवंत आहोत ते मोदीजींनी तयार केलेल्या लसीमुळे, असं म्हटलं होतं. त्यावर ठाकरे म्हणाले की, मोदीजींनी लस तयार केली असेल तर संशोधक काय गवत उपटत बसले होते का? अशा लोकांनी समीर चौगुलेंच्या दवाखान्यात मानसिक उपचार करायला पाठवलं पाहिजे.

कार्यकर्त्यांना दिलं चॅलेंज

कार्यकर्त्यांना आवाहन करतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज दिलेलं आव्हान आपल्यातल्या हरामखोरांनी दिलेलं आहेच पण आपल्या एकेकाळच्या मित्रानेही दिलेलं आहे. आव्हान देणारा शत्रु आता ठेवायचा नाही, हेच आपलं शेवटचं आव्हान असल्याचं ठाकरे म्हणाले. त्यांनी कार्यकर्त्यांना विरोधकांना नमोहरम करण्याचं चॅलेंज दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT