Eknath Shinde vs Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Shiv Sena : 'कागदावरचा चोरला, परंतु बाळासाहेब ज्याची पूजा करायचे तो धनुष्यबाण कसा चोरणार?'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना हे पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या धक्क्यानंतर उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. संतप्त होत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शिंदे गटाने कागदावरचा धनुष्यबाण चोरला आहे. परंतु जो आमच्या देव्हाऱ्यात पुजला जातो, तो कसा चोरणार? शिवसेनाप्रमुख स्वतः या धनुष्यबाणाची पूजा करायचे त्यामुळे हा आमच्याकडेच राहणार आहे, असं म्हणत त्यांनी उपस्थित पत्रकारांना देवघरातला धनुष्यबाण दाखवला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

  • शिंदे गटाने केवळ कागदावरचा धनुष्यबाण चोरला आहे

  • शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाण ज्याची पूजा आम्ही आजही करतो, तो कसा चोरणार?

  • स्वतः बाळासाहेब पूजा करायचे तो धनुष्यबाण आमच्याकडेच आहे

  • नामर्दांनो, तुम्हाला ही चोरी पचणार नाही

  • आमचा विश्वास न्यायमूर्तींवर आहे, कोर्टात काय होतं ते पाहावं लागेल

  • भाजपने देशातल्या निवडणुका संपवून एकछत्री कार्यक्रम सुरु करावा

  • निवडणूक आयोगाने ठरवून निकाल दिलेला आहे

  • ज्या पद्धतीने हलकटपणा चालला आहे, त्यावरुन उद्या हे मशालही काढून घेतील

दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राऊत म्हणाले की, जो पक्ष बाळासाहेबांनी, लाखो शिवसैनिकांनी बलिदान देऊन मोठा केला. तो पक्ष ४० बाजारबुणगे विकत घेतात. यावर काय बोलावं, लोकशाहीवरचा विश्वास आज गमावला आहे.

देशातील सगळ्या स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. न्यायव्यवस्था देखील गुलाम असल्यासारखं वागत आहेत. ४० बाजारबुणगे हे पैशांच्या जोरावर पक्ष विकत घेत असतील सगळ्या व्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT