महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

''पराभव समोर दिसत असल्याने मोदी सरकार अशा कुरापती करत आहे. मतदान केंद्रावर दिरंगाई झाल्यास जवळच्या आमच्या शाखेमध्ये मतदारांनी संपर्क साधावा. जिथे गैरप्रकार झालेला आहे तिथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयडी कार्ड बघा, नावं विचारा.. ती नावं मी स्वतः जाहीर करणार आहे. शिवाय त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत.'' असं आवाहन ठाकरेंनी मतदारांना केलं आहे.

संतोष कानडे

Mumbai Lok sabha election 2024 : पहाटेचे पाच वाजले तरी कुणीही मागे हटू नका, दिरंगाईमुळे माघारी गेलेल्या मतदारांनी पुन्हा मतदानाला जावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ज्या मतदान केंद्रांवर जाणीवपूर्वक दिरंगाई केली जातेय, तिथल्या कर्मचाऱ्यांचे आयडी कार्ड बघा आणि नावं लिहून घ्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे.

मुंबईमध्ये अनेक मतदान केंद्रांवर गैरप्रकार सुरु असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. मतदान केंद्रांवर कसलीही सोय केलेली नाही. तरीही मतदार रांगेमध्ये उभे आहेत.

''पराभव समोर दिसत असल्याने मोदी सरकार अशा कुरापती करत आहे. मतदान केंद्रावर दिरंगाई झाल्यास जवळच्या आमच्या शाखेमध्ये मतदारांनी संपर्क साधावा. जिथे गैरप्रकार झालेला आहे तिथल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आयडी कार्ड बघा, नावं विचारा.. ती नावं मी स्वतः जाहीर करणार आहे. शिवाय त्यांच्याविरोधात आम्ही कोर्टात जाणार आहोत.'' असं आवाहन ठाकरेंनी मतदारांना केलं आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मोदी सरकार परभावाच्या भीतीने पछाडलेलं आहे. मतदानाला कितीही उशीर झाला, पहाटे पाच वाजले तरी चालतील पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नीचपणाचा खेळ खेळला जातोय. मतदान कमी व्हावं, यासाठी षड्यंत्र सुरु आहे. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करत असल्याचं दिसून येत आहे, असा घणाघात त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT