Uddhav Thackeray  sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : आता उसंत नको; जनतेत जा,ठाकरे

‘‘विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीबरोबर एकत्रच लढायच्या आहेत त्यासाठी आताच कामाला लागा. पाऊस आहे म्हणून उसंत घेऊ नका; जनतेपर्यंत पोहोचा,’’ असे निर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीबरोबर एकत्रच लढायच्या आहेत त्यासाठी आताच कामाला लागा. पाऊस आहे म्हणून उसंत घेऊ नका; जनतेपर्यंत पोहोचा,’’ असे निर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले. पक्ष आणि चिन्ह नसतानाही पक्षाने चांगली भरारी घेतली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलाविली होती. निवडणुकीतील विजयाबरोबरच ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला तेथील कारणे त्यांनी यावेळी जाणून घेतली. ठाकरे म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी म्हणून लढताना पक्षाला मोठा विजय मिळाला नसला तरी तो समाधानकारक आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह नसतानाही आपण ही निवडणूक लढलो.’’

शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढेल. राज्यातील विधानसभेच्या १८० ते १८५ जागा जिंकू

- संजय राऊत, खासदार

राज्याचा दौरा करणार

विधानसभेची आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे, त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करतानाच ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे याचा पुनरुच्चारही केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर मी स्वत: महाराष्ट्रात फिरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

‘दुःखी असलात तरी फॅशनेबल दिसावं लागतं...’; प्रीती झिंटा कलाकारांबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली...

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

MPSC Exam Pattern : एमपीएससी प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता अन् वेळापत्रक बदलणार? कृती दलाचे सदस्य डॉ. प्रवीण गेडाम अंतिम अहवालाबाबत नेमके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT