Chandrashekhar Bawankule Afzal Khan Kabar Pratapgad esakal
महाराष्ट्र बातम्या

मतांच्या लालसेपोटीच उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीजवळच्या अतिक्रमणाला संरक्षण दिलं; बावनकुळेंचा गंभीर आरोप

शिंदे-फडणवीस सरकारनं अफजल खानच्या थडग्याजवळच्या बांधकामावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिंदे-फडणवीस सरकारनं अफजल खानच्या थडग्याजवळच्या बांधकामावर सर्जिकल स्ट्राइक केला आहे.

Afzal Khan Kabar Pratapgad : प्रतापगड परिसरात असलेल्या अफजल खानच्या थडग्याजवळचं अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात रातोरात हटवण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलं. अतिक्रमण पाडण्यासाठी बुधवारी रात्रीपासूनच जोरदार तयारी सुरू झाली होती. शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) हा सर्जिकल स्ट्राइक मानला जात आहे.

या कारवाईनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. मतांच्या लालसेपोटी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ठोस भूमिका घेतली नाही, अशी टीका बावनकुळेंनी आज साताऱ्यात केली. प्रतापगडावरील अफजल खान कबर परिसरातील अतिक्रमण काढल्यानं बावनकुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक करत आभार मानलेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे आजपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत.

बावनकुळेंनी नुकतीच खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पत्रकार परिषद घेत काही मुद्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडी सरकारनं, तसंच उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीच्या अतिक्रमणास संरक्षण दिलं. उद्धव ठाकरेंनी कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. मतांसाठीच त्यांनी असं धाडस केलं नाही, असंही बावनकुळेंनी स्पष्ट केलं.

शिवाजी महाराजांनी त्यांच्या शत्रूसाठी देखील कबर बांधली - उदयनराजे

छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मान सन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूसाठी देखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केलं नाही. मात्र, या कबरीभोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अतिक्रमण तोडून ही कबर खुली करायला हवी. त्यामुळं त्या कबरी मागचा इतिहास येणाऱ्या पिढीला कळू शकेल. अफजल खान मुस्लिम होता म्हणून ही कारवाई केली असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो, त्यामुळं कायदा हा सर्वांसाठी समान असतो. त्यामुळं या कारवाईला धार्मिक आणि राजकीय रंग देणं चुकीचं आहे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT