Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : पोहरादेवी संस्थानने उद्धव ठाकरेंना मानलं दत्तकपुत्र; म्हणाले, आता सरकारच्या नाकात दम...

संतोष कानडे

यवतमाळः पक्षामध्ये झालेल्या पडझडीनंतर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. सुरुवातीला ते विदर्भातील जिल्हे पिंजून काढणार आहेत. आज पोहरादेवीचं दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली.

पोहरादेवीच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा मतदारसंघ दिग्रस येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी-शाह यांच्यासह राज्य सराकर आणि बदलेली नवीन समीकरणं; यावरुन जोरदार टीकास्र सोडलं. शिवाय पोहरादेवी संस्थानने दिलेल्या आशीर्वादाचाही उल्लेख केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार खासदार गेले तरी चालतील, दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा मी पोहरादेवीला आलो होतो. मी विकासाचा आराखडा मंजूर केली आणि निधी दिला.. परंतु अद्याप इथे काहीही काम झालेलं नाही. निदान रस्ता तरी करायचा? निधी कुठे गेला कुणी खाल्ला? याबद्दल सरकारने उत्तर द्यावं.

ते पुढे म्हणाले की, पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो. सुनिल महाराज आणि साधू-संतांनी आशीर्वाद दिले. मला एक पट्टा दिला, कडं दिलं. या कड्याचं महत्व असं आहे की, आम्ही तुम्हांला दत्तकपुत्र मानतो, असं महंत म्हणाले. त्यामुळे पोहरादेवीचा विकास करुन अभिमान वाटेल, असं चित्र निर्माण करुन दाखवायचं आहे. सरकारच्या नाकात दम आणून तीर्थक्षेत्राचा कायापालट करुन दाखवायचा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे...

  • शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत आणि हे लोक दुसऱ्यांची घरं फोडत आहेत

  • घरं फोडण्याचं हिंदुत्व तुम्हांला मान्य आहे का?

  • तुमचं सरकार आहे तर वीज बिल माफ करा

  • घरी बसून मी महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता

  • तुम्ही गावोगावी फिरुन आशीर्वाद घेऊन देखवा

  • मी नेतृत्व करायचं की नाही हा अधिकार मला आहे, मोदी-शाहांनी ठरवायचं नाही

  • गद्दारांना गाडण्याची ताकद आई जगदंबा आम्हांला देणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Latest Marathi News Live Update : साताऱ्यातील दरोडा घालणाऱ्या आरोपींना अटक; 21 तोळे सोनेसह पाच जण जेरबंद

Danger Tribe : जगातला सगळ्यात भयानक समुदाय, इथले लोक स्वतःच्या आई-वडिलांच्या मृत शरीराला कच्चे खातात

Ajit Pawar Plane Accident: विमान अपघाताची सखोल चौकशी हवी; राष्ट्रवादीची भूमिका सुनिल तटकरे यांचे बारामतीत प्रतिपादन..

FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

SCROLL FOR NEXT