uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow
महाराष्ट्र बातम्या

"उद्या भाडोत्री सरकारही आणणार का?" 'अग्निपथ'वरून CM ठाकरेंचा केंद्राला टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मागील काही दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्ला केला जात आहे. या योजनेच्या विरोधात निर्दशने केली जात आहे. योजनेविरुद्ध टीका करण्यात मुख्यमंत्रीही मागे राहिलेले नाही. सैनिकांना चार वर्षांसाठी भाडेतत्वावर घेत आहात. उद्या चालून भाडोत्री सरकारही आणणार का, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारवर (Central government) लगावला. (uddhav thackeray question to the Center government; Will the rent's government hire tomorrow)

मुंबईत आयोजित शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते. उमेदीच्या वयात देशातील तरुणांना मोठे स्वप्न दाखवायचे. त्यांना त्याच्या मागे धावायला लावायचे. चार वर्षांनंतर त्यांचे काय, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला केला.

आज भाड्यावर सैनिक घेत आहात. उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणणार का? भाडोत्री सरकार आणणार का? मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे टेंडर काढणार का? नाहीतरी दर पाच वर्षांनी नागरिकांना मते मागाला जावचं लागते, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी हाणला.

केंद्र सरकारने (Central government) देशातील नागरिकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन सरकारने पाळले नाही. आता अग्निपथ योजनेची घोषणा करून युवकांशी खेळले जात आहे. फक्त नावच मोठे दिले आहे. काम मात्र सुतार काम व वाहन चालकाचे करावे लागणार आहे. कोणत्या योजनेला कोणते नाव देताहेत याचाही विचार करीत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दहा टक्के आरक्षणानी काय होणार?

१७ ते २१ या उमेदीचा वयात तरुणांना कंत्राटी काम देण्याची योजना सरकारने आखली आहे. उमेदीच्या वयाच त्यांच्याशी खेळले जात आहे. चार वर्षांनी १० टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. दहा टक्के आरक्षणानी काय होणार आहे. उर्वरित तरुणांनी उमेदीचा काळ सेनेला दिल्यानंतर त्यांनी काय करावे, असा प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारला विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT