Raj Thackeray Uddhav Thackeray  Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : 'तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो' म्हणण्याचा अधिकार नाही; मनसेचे ८ प्रश्न

उद्धव ठाकरेंना मनसेकडून एक सविस्तर पत्र लिहिण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

दसरा मेळावा आता अगदी तोंडावर आला आहे. शिवसेनेत दोन गट पडल्याने यंदा इतिहासात पहिल्यांदाच सेनेचे दोन दसरा मेळावे होणार आहेत. यानिमित्ताने मनसेने उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये मनसेने त्यांना आठ प्रश्न विचारले आहेत. तसंच तुम्हाला "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो" हे म्हणण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही केली आहे.

मनसेचे प्रवक्ते योगेश खैरेंनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पत्रात उद्धव ठाकरेंना आठ प्रश्न विचारण्यात आले आहेत. या पत्रात लिहिलं आहे की, उद्धवजी, उद्या शिवतीर्थावर "जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो" म्हणण्याआधी या प्रश्नांची उत्तरं द्या.

१. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी या बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षांशी युती का केली?

२. PFI सारखी संघटना पाकिस्तान जिंदाबाद घोषणा देत असताना आपण काहीही न बोलता शांत का बसलात?

३. एमआयएम सपा सारख्या पक्षांसोबत दोन चार मतांसाठी हातमिळवणी का केली?

४. सत्तेत असतानाही औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण का रोखलं नाही?

५. मशिदीवरील भोगं उतरले पाहिजेत हा बाळासाहेबांचा विचार असताना त्यासाठी केलेल्या आंदोलनात महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे का दाखल केले?

६. बाळासाहेबांचा जनाब असा उल्लेख करून त्यांच्या हिंदुत्ववादी प्रतिमेला डाग का लावलात?

७. अजान स्पर्धा आयोजित करून कुठल्या हिंदुत्वाची उभारणी केली?

८. आपलं सरकार जाणार हे दिसल्यावरच औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हे कसं सुचलं?

साहजिकच या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार. त्यामुळे माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणण्याचा आणि बाळासाहेबांचा वैचारिक वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकारच उरला नाही, असं म्हणत या पत्राची सांगता करण्यात आली आहे.

उद्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेनेचा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे तर शिंदे गटाचा मेळावा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT