महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : ब्रेकिंग! उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार; दोन्ही भाऊ एकत्र येणार का?

संतोष कानडे

मुंबईः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात उभय नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय.

राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची जुनी भाषणं संग्रहित केलेली आहेत. १९९०पूर्वी जेव्हा अपुरी साधणं उपलब्ध होती, तेव्हा त्यांनी ग्रामोफोनमध्ये बाळासाहेबांची भाषणं रेकॉर्ड केलेली. ती भाषणं राज ठाकरेंकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हटल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी या भाषणांची उद्धव ठाकरेंना आवश्यकता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांच्याशी फोनवरुन संवाद साधणार असल्याचं सांगितलं जातंय. याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्ताने दोन्ही नेते आपसात बोलणार आहेत. असं असलं तरी राजकीयदृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. मागच्याच महिन्यात राज आणि उद्धव एकत्र येणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. शेवटी राज ठाकरेंनी सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंशी चर्चा करणार, यासंदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली. देशपांडे म्हणाले की, स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं हवी आहेत तर मग इगो कशाला पाहिजे. जो व्यक्ती दुसऱ्यांचे फोन उचलत नाही त्यांना कशाची भीती वाटत आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला फोन करण्यासाठी कुठल्याही गॅरंटीची गरज नसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parth Pawar Engagement : खासदार पार्थ पवार-कायनात धार यांचा 29 जुलैला पुण्यात साखरपुडा

मोशी दुर्घटनेत ७० तासांनतरही बचावकार्य सुरु! ढिगाऱ्याखाली ३ जण जिवंत दिसले, सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोशीच्या दुर्घटनास्थळाला देणार भेट

Pune Palkhi Sohala : विठू नामाचा गजर अन् डोळ्यात पाणी! दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊली-तुकोबांची पालखी पंढरीकडे मार्गस्थ, पुण्यनगरी भावुक, 'असा' दिला निरोप

IND vs ENG 1st ODI: भारत-इंग्लंड वनडे मालिका 'या' तारखेपासून ; जाणून घ्या कुठे, किती वाजता अन् कोणत्या चॅनेलवर पाहाल फ्री पहिली मॅच...

SCROLL FOR NEXT