Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: शिवसेना नकली असायला तुमची डिग्री आहे का?; उद्धव ठाकरेंचे PM मोदींना प्रत्युत्तर

Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर ठाकरेंनी जोरदार पलटवार केला आहे.

Sandip Kapde

Uddhav Thackeray: महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पालघर येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर जोरदार टीका केली. मोदींच नाणं चालत नाही म्हणून शिवसेना फोडली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नकली शिवसेना म्हणायला ही मोदींची डिग्री नाही असे देखील ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली शिवसेनेच्या टिकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एकनाथ शिंदे बोलतात ते बाळासाहेबांचे विचार नाहीत.  दिल्लीचा फोन आला की मिधेंची दाढी चळाचळा कापते. बाळासाहेबांच्या फोनमुळे नेत्यांची चळाचळा कापायची, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांना संपवलं आहे. यांना माहिती देखील नाही यांच्या बुडाखालची सतरंजी काढून घेतली. अजून पालघरी उमेदवारी जाहीर केली नाही. त्यांना स्वत:च्या मुलाची उमेदवारी जाहीर करता येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Parishad Election : मविआकडून पुन्हा ठाकरेंना संधीची शक्यता, तर शिंदे सेनेत २ जागांसाठी ६ नावं चर्चेत

...म्हणून मी प्लेबॉय बनलो, आरोपी अयानची पोलिसासमोर धक्कादायक कबुली

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा झंझावात की दिल्ली कॅपिटल्सचा पलटवार? आजचा सामना ठरणार थरारक, कशी असेल Playing XI

'जर तरची गोष्ट'नंतर प्रिया-उमेश निर्मात्यांच्या भूमिकेत ! हर्षदा खानविलकर आणि सुनील बर्वे जोडीसहित केली नव्या नाटकाची घोषणा

Latest Marathi News Live Update : सरकारकडून अचानक स्टेनोग्राफर पदांसाठीची भरती रद्द

SCROLL FOR NEXT