Devendra Fadnavis On Nawab Malik Resignation Uddhav Thackeray e sakal
महाराष्ट्र बातम्या

शेवटी मुख्यमंत्री भाजपला म्हणाले, कुटुंबियांची बदनामी करु नका, मी येतो तुमच्यासोबत...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: विधीमंडळ अर्थसंकल्पी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. ईडीच्या सहाय्याने कुटुंबियांची बदनामी करण्याचं कृत्य हे नीच असून ही अघोषित आणीबाणी असल्याची टीका त्यांनी केली आहे. (Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की, सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता तर तुम्ही नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून बसला असता. आम्ही जर का तुमचा पट्टा गळ्यात बांधला असता तर माझ्या कुटुंबीयांवर आच आली नसती. पुढे ते म्हणाले की, हे नीच, निंदनीय आणि विकृत गोष्ट आहे की, एकमेकांच्या कुटुंबियांची बदनामी करणे. मर्द असशील तर मर्दासारखा ये पुढे. सत्तेचा दुरुपयोग, केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयो करण्यात कसला आलाय मर्दपणा? तुम्ही आमच्या कुटुंबाची बदनामी करताय, हा नीचपणा आहे. दुसऱ्यांना वाईट म्हणताय पण तुम्ही किती चांगले आहात? असाही सवाल त्यांनी केलाय. पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, इंदिरा गांधी यांनी किमान आणीबाणी घोषित केली. मात्र, ही अघोषित आणीबाणी आहे. इंदिरा गांधी डरपोक नव्हत्या. (Uddhav Thackeray)

पुढे ते म्हणाले की, तुम्हाला सत्ता हवीय ना? म्हणून तुम्ही कुटुंबियांची बदनामी करत आहात, असे चाळे करत आहात ना? चला मी या सगळ्यांसमोर सांगतो की, उगाच पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका, त्यासाठी खर्च करु नका. मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो. सत्तेसाठी नाही येत. तुम्ही जे चाळे केले आहेत. कुटुंबियांची बदनामी करण्याचे... मी याला घाबरत नाही. पण मी येतो.. इतका जीव जळतो तर... मला टाका तुरुंगात... मी माझ्या शिवसैनिकांची जबाबदारी घेतो.. पण त्यांना छळू नका.. असंही मुख्यमंत्री म्हणाले. (Uddhav Thackeray)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : देशातील पहिल्या पर्यटन पाणबुडीच्या बांधणीला सुरुवात; २०२७ मध्ये प्रकल्प पूर्ण होणार

Nagpur Raid: नागपूरमध्ये कामोत्तेजना वाढवणारं बोगस औषध उजेडात! 'या' कॅप्सुलचा पर्दाफाश; अन्न व औषध प्रशासनाची रेड

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सीसीटीव्ही, डीएनए पुराव्यांवरून आरोपीचा खोटेपणा उघड; २५ जूनला निकाल

Strait of Hormuz Closed: पुन्हा मध्यपूर्वेत युद्धाची चिन्हे? होर्मुझ सामुद्रधुनी बंद; इराणचा मोठा निर्णय, दिला मोठा इशारा

IND vs AFG: यशस्वी जैस्वालचे खणखणीत शतक अन् मग विजयी षटकार... भारताचा अफगाणिस्तानला व्हाईटवॉश

SCROLL FOR NEXT