Eknath Shinde Uddhav Thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

उद्या हे स्वतःला मोदी समजून पंतप्रधान पदावर दावा सांगतील; ठाकरेंचा शिंदेंना टोला

भाजपवाल्यांना सावध राहण्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीची सध्या चांगलीच चर्चा आहे. मुलाखतीचा आज दुसरा भाग प्रसारित केला जात आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे. उद्या हे पंतप्रधान पदावरही दावा सांगतील, त्यामुळे भाजपवाल्यांनो सावध राहा, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा एक भाग काल प्रसिद्ध झाला होता. तर दुसरा भाग आज उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसादिवशी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर सडकून टीका केली आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपाला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वतःला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. भाजपावाल्यांनो सावधान.

फुटिरांवर टीका करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)म्हणाले की, आधी भाजपाबरोबर सत्तेत होतो, तेव्हा भाजपा त्रास देतोय असं म्हणायचे. भाजपा नको असं सांगणारे हेच लोक...गावागावात भाजपा सेनेला काम करू देत नाही, भाजपा शिवसेनेला संपवतेय असा यांचा आक्षेप होता. २०१९ साली भाजपाने खोटेपणाचा कळस केलाय. ठरवलेल्या गोष्टी नाकारतोय म्हणून आपण महाविकास आघाडीला जन्म दिला. तर म्हणे आता काँग्रेस राष्ट्रवादीवाले त्रास देतात. मग नेमकं तुम्हाला हवंय तरी काय? की फक्त कारणं शोधताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT