eknath shinde uddhav thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

'ठाकरे' नावाचा करिष्माच सेनेला तारणार? शिवसैनिक कोणासोबत?

शिवसेना हा व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे, त्याचं पुढे काय होणार, असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आणि महत्त्वाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने आणि बहुतांश शिवसेना आमदार त्यांच्यासोबत गेल्याने आता शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे. याच अनुषंगाने सकाळ आणि साम यांच्या वतीने एक सर्वेक्षण करण्यात आलं. (Maharashtra Politics)

सर्वेक्षणात ८२.४ % शिवसैनिक म्हणतात की ते उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) आहेत. शिवसेना (Shivsena) हा पूर्णतः व्यक्तिकेंद्रीत पक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि त्यानंतर त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांचं पक्षात नेतृत्व आहे. भावनिकता हे व्यक्तिकेंद्रीत पक्षाचे गुणवैशिष्ट्य असते. हे गुणवैशिष्ट्य शिवसेनेला ततोतंत लागू आहे. त्यामुळे, ठाकरे आडनावाचा करिष्मा पक्षात शिंदे यांच्या बंडानंतरही कायम आहे. यामुळेच एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही स्थानिक पातळीवरील शिवसैनिक ठाकरेंच्या बाजूने आहे. त्यांनी अजूनही हिंदुत्व किंवा इतर मुद्द्यांपेक्षा ठाकरेंच्या नावाशी भावनिकतेचं नातं कायम ठेवलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. त्यामध्ये नेमकं कुणाचं सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ४०पेक्षा अधिक आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये तळ ठोकला आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ आणि सामने केलेल्या या सर्वेक्षणातून केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT