Uddhav Thackeray  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : 'त्या खलबत्त्यामध्ये चाणक्य अन् त्याची कूटनीती…', उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

रोहित कणसे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दीक चकमक सुरू आहे. बोलतांना देवेंद्र फडणवीसांनी २०१९मध्ये उद्धव ठाकरेंसोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेचा पुन्हा उल्लेख केला. यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर टीका जेव्हा जेव्हा बेईमानी होईल तेव्हा तेव्हा कूटनीतीचा वापर करावाच लागेल असं विधान केलं. दरम्यान या टीकेला ठाकरेंनी जोरदार प्रत्तुत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल अर्धे उपमुख्यमंत्री बोलले की आमची कूटनीती आहे. राष्ट्रवादी सोबत गेलो ती त्यांची कुटनीती आहे. ही कूटनीती आपल्याला कुटून टाकायची आहे. त्यांना कळलेला नाही की जनतेचा खलबत्ता किती मोठा आहे. तुमची आतल्याआत खलबतं चालतात. चाणक्य नेहमी खलबतं करतो. जनतेकडे खलबत्ता असतो, त्या खलबत्त्यामध्ये चाणक्य आणि त्याची कूटनीती आपल्याला कुटून त्याचं चूर्ण करून टाकायचं आहे.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावतात. आज सकाळी मी ममता बॅनर्जी यांच्याशी बोललो, त्यांचं अभिनंदन केले. यांच्याकडे पण हेच चालले आहे, केंद्रीय राखीव दल आणून सुद्धा, हिंसाचार करून सुद्धा ममतांच्या जनतेने त्यांची लाँड्री धुवून टाकली. भाजपकडे लाँड्री आहे असं म्हणतात, भ्रष्टाचारी असला की लाँड्रीत टाकून स्वच्छ करून घेतात. बंगाल आणि कर्नाटकने सुद्धा यांच्या लाँड्रीची विल्हेवाट लावून टाकली तशीच लाँड्रीची विल्हेवाट आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने महाराष्ट्रात करायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

तुमच्यामध्ये उत्साह आहे आणि त्या उत्साहमध्ये राग सुद्धा आहे. महाराष्ट्रात फिरतोय, पोहरादेवीचं दर्शन घेतलं. वृत्तपत्रामध्ये बातमी येते शिवसेनेला धक्का, आपल्याला धक्का देणारा जन्माला आलेला नाही. होतं ते चांगलं होतं, गद्दारी केली त्यांनी केवळ शिवसेनेशी नाही तर तुमच्याशी आणि तुमच्या विभागातील जनतेशी केली, ही गद्दारी आता गाढून टाकायची आहे असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT