फाइल फोटो
फाइल फोटो e sakal
महाराष्ट्र

PM Modi News : तेव्हा बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क काढून घेतला होता, आता PM मोदी…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय वातावरण चांगलंच तापताना दिसत आहे. निवडणूक मतादानापूर्वी भाजप-काँग्रेस यांच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचा मदतानाचा अधिकार काढून घेतल्याची आठवण सांगत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधीकार काढण्यात आला होता, कारण त्यांनी हिंदूत्वाचा प्रचार केला म्हणून. आता कर्नाटक निवडणूकीमध्ये बजरंग दलाच्या निमीत्ताने असेना पंतप्रधान मोदी यांनी मतदान करताना बजरंग बली की जय म्हणून मतदान करा.

पंतप्रधान असे बोलले असतील तर याचा अर्थ धार्मिक प्रचाराबाबत निवडूक कायद्यात बदल झाला असेल असं मी मानतो. कारण त्यावेळी हिंदूत्वाचा प्रचार केला म्हणून हिंदू हृदयसम्राटांचा मतदानाचा अधिकार देखील काढला, त्यांना निवडणूक लढवण्यास देखील बंदी घालण्यात आली होती.

पण ज्या अर्थी पंतप्रधानान 'बजरंग बली की जय' म्हणून मतदान करायला सांगत असतील तर मग मी तिथल्या कर्नाटक व्यप्त महाराष्ट्रीतल माता बहिणींना मतदान करताना 'छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून किंवा 'जय शिवराय बोलून मराठी माणसांची एकता जपणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे बालताना म्हणाले की, मोदींनी जसं जय बजरंग बली म्हणून मतदान करायाला सांगितलं आहे, तर तुम्ही जय भवानी जय शिवाजी बोलून मतदान करा, पण मराठी माणसाटी एकजूट तुटू फुटू देऊ नका असं अवाहन उद्धव ठाकरे यांनी सीमाभागातील नागरीकांना केलं.

कर्नाटक निवडणूक प्रचारादरम्यान बुधवारी मुल्की येथील कोलनाड येथे पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी ‘बजरंगबली की जय’ या घोषणेने भाषणाची सुरुवात केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT