Thakrey 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : लहान, मोठा भाऊ असं काही नसतं; नातं महत्वाचं : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लहान, मोठा भाऊ असं काही नसतं; भावा-भावाचं नातं महत्वाचं असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, आकड्यावर सगळं काही अवलंबून नसतं, एकदा ठरवलं की बाकीच्या वस्तू आपणहून येत असतात. शिवसेना भाजप मनाने एकत्र आहेत. युतीचा प्रश्न समजूतदारपणे सोडवला असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, तुझं माझं न करता आम्ही सत्तेत आल्यास एकत्रित व्यवस्थित काम करू असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

 

पत्रकारांनी आदित्य ठाकरेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारले असता, जर शिवसैनिकांची इच्छा असेल तर त्यात गैर काय असे प्रतिसवाल उद्धव यांनी केला. आम्हाला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT