Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: महाराष्ट्र गिळायचा प्रयत्न केला तर... विरोधकांना थेट इशारा, नागपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Uddhav Thackeray Speech: आज नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण पार पडले. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. तेव्हा त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला आहे.

Vrushal Karmarkar

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज नागपुरात होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाषण केले आहे. यात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, माध्यमांमुळे दिल्लीतील ठग आपल्याकडे बघणार आहेत. अजून निवडणुकीचे वातावरण तापलेलं नाही आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सिनेटच्या निवडणुकीत विरोधातील उमेदवारांची डिपॉझिट जप्त झाली असती. काही जण कोर्टात गेले. निवडणुकीचा दिवस बदलला. तरीही आम्ही जिंकलो. आता मशाल पेटलेली आहे. ही मशाल आता अंधार दूर करणार आहे, असं ते म्हणाले.

मालवणची घटना लाजिरवाणी आहे. पुतळा उभारण्यातही तुम्ही पैसे खाल्ले आहेत. त्यात सामग्री गंजलेली वापरली. त्यामुळे पुतळा पडला आणि एकनाथ शिंदे दाढी खाजवत म्हणतात वाऱ्याने पुतळा पडला. पण मला हे विचारायचे आहे की, वाऱ्याने तुमची दाढी नाही का पडत? एखादी गोष्ट करताना आत्मविश्वास पाहिजे की, जे करतोय ते दैवताला साजेसे करतो आहे. शिवराय आपले दैवत आहेत.

अमित शाहांवर बोलताना ते म्हणाले की, मला ते बोलले होते औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक. मात्र मी संस्थापक असेन तर तुम्ही अहमदशाह अब्दाली आहात. हे बंद दारामागचे धंदे सोडा, हिम्मत असेल तर शिवरांयांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. हिंम्मत असेल तर शिवसेना संपवून दाखवा, का संपवायची? आम्ही तर तुमच्या सोबतच होतो, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Konkan Railway: कोकण रेल्वेचा मोठा बदल! आता पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून धावणार गाड्या; नवा मार्ग कसा आहे? जाणून घ्या...

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: मंगळवेढ्यात फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

SCROLL FOR NEXT