uddhav thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan: एक फूल, दोन हाफ यांना आंदोलनाची माहिती नव्हती का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

कार्तिक पुजारी

Mumbai News - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवा सेनेच्या बैठकीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जवर भाष्य केलं. पोलिस दल इतके हिंसक कसे होऊ शकते? नक्कीच यामागे कोणाचा तरी हात असला पाहिजे. घरात घुसून महिलांना मारहाण करण्यात आली.

आता पुन्हा चौकशीचं आश्वासन दिलं आहे. हा नुसता फार्स आहे. एक फुल, दोन हाफ यांना माहिती नाही का आंदोलन होणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक पार पडली. काल एक मेसेज आला होता. पक्ष चोरला, नाव चोरलं, पण ठाकरेंनी इंडिया एकत्र करून दाखवला. विरोधकांना टीका करु देत. त्यांच्या पोटात या आघाडीमुळे गोळा येत आहे, असं ठाकरे म्हणाले. शनिवारी रात्री जालनात जात असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी दिली.

सरकार म्हणजे कोण? पाहिलं तर एक फूल, दोन हाफ आहे. जालन्यात आंदोलकांवर लाठीमार झाला. कोणाच्याही आदेशाशिवाय असू होऊ शकत नाही. आता सखोल चौकशी करणार असे बोलत आहेत, पण आंदोलन स्थळी गेले नाहीत. कुठे आंदोलन सुरु आहे ह्याची माहिती आधीच दिली जाते.मी स्वतः मुख्यमंत्री होतो तेव्हा ही माहिती मिळायची. एक फूल, दोन हाफ यांना माहिती नव्हतं का आंदोलन होणार आहे, असा सवाल त्यांनी केला.

काल आणि परवा जेव्हा बैठक सुरु होती. त्यावर बैठकीवर टीका करण्यात आली. इंडिया म्हणजे चिंदिया पण तुमचे चिंदी चिंदी झाले आहे ते बघा. मी बारसुला गेलो, त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला. वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला. काल मराठा आंदोलनावर लाठीचार्ज झाला. कोरोना काळात जे पोलीस धावून आले ते पोलीस आदेशाशिवाय कसे करू शकत नाहीत, असं ठाकरे म्हणाले.

आज आदित्य L1 हे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उड्डाण घेतलं आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. यान सूर्यावर उतरणार नाही, नाहीतर कोणी तरी बोलेल सूर्यावर उतरणाऱ्या वैज्ञानिकांना शुभेच्छा, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT