uddhav thackeray support of another bhartiy communist party party  esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray: ठाकरेंची ताकद वाढली; भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शिवसेनेला पाठिंबा

सकाळ डिजिटल टीम

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला चक्क कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.(uddhav thackeray support of another bhartiy communist party party for Andheri by-election maharashtra politics )

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक शिष्टमंडळ आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर गेले. मातोश्रीवर झालेल्या भेटीत या शिष्टमंडळाने 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' गटाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दर्शवला.

मातोश्रीवर पोहोचलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, मुंबई सचिव मिलिंद रानडे, प्रकाश नार्वेकर, विजय दळवी, बबली रावत आदीचा समावेश होता. भाकपच्या शिंष्टमंडळाची भेट शिवसेनेच्या खासदार अरविंद सावंत, आमदार अनिल परब, आमदार रविंद्र वायकर, सुनील प्रभू, रमेश कोरगावंकर यांनी घेतली.

शिवसेनेमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा सेवक संघानेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेस पाठिंबा दिला आहे. आता डाव्या पक्षांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.

अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, अस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यापूर्वीच जाहीर केलं आहे. तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही अंधेरी पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा पूर्णपणे पाठिंबा शिवसेना उमेदवाराला असल्याचे घोषित केले आहे.

त्यामुळे, शिवसेनेला मोठं समर्थन मिळालं आहे. त्यातच, गेल्या ५० वर्षांपासून शिवसेनेच्या विरोधात असलेल्या भाकपनेही जाहीर अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : राष्ट्रवादीच्या नाशिकच्या शिबिरात जयंत पाटलांचा गोंधळ! शिबिराऐवजी हवनाकडे वळले अन्...

Mobile Recharge Rules : फोनला रिचार्ज नसल्यास सिमकार्ड किती दिवस काम करते? खूप महिने बंद राहिल्यास काय होते, जाणून घ्या सर्व काही

Mangalwedha Rain : मंगळवेढ्यात सततच्या पावसाने खरीप पिकांचे मोठे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Godavari Flood: गोदावरी नदीत जायकवाडी धरणातून पाणी विसर्ग; गेवराई तालुक्यातील बत्तीस गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates: अमरावतीच्या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा संप कायम

SCROLL FOR NEXT