शाळा 
महाराष्ट्र बातम्या

17 ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही

नामदेव कुंभार

शाळा 17 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने रद्द केला आहे. शालेय शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. गुरुवारी टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 18 वर्षांखालील मुलांचे लसीकरण झाले नसताना त्यांना शाळेत बोलवणं धोकादायक असल्याची भूमिका तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा रद्द करण्याचा निर्णय झाला. यामुळे तुर्तास तरी शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. तिसऱ्या लाटेचा अभ्यास करुन दिवाळीनंतर शाळा सुरु करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्याचं वृत्त आहे.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अद्याप संपला नाही. त्यातच तिसऱ्या लाटेची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका सर्वाधिक मुलांना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे शाळा सुरु करुन मुलांचा जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. त्यामुळेच टास्क फोर्सच्या बैठकीत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑफलाइन शाळा बंद असल्या तरीही ऑनलाइन क्लास सुरु राहणार आहेत.

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, तिसऱ्या लाटेचे परिणाम जगभरात दिसत आहेत. आपल्याकडेही तिसरी लाट येईल, असे भाकीत केले जात आहे. या सर्वांवर लक्ष देऊन शालेय विभाग निर्णय घेईल तसेच मुख्यमंत्रीही टास्क फोर्सशी चर्चा करतील.

शाळा सुरू नाहीत, पालकांना दिलासा देण गरजेचं आहे. पण फी दिली नाही तर पगार संस्थेतील पगार ही होणार नाही, असल्याचं मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं. काही संस्थाचालकांकडून विनाकारण पालकांकडून ज्यांचा वापर नाही त्याची फी घेतात हेही चुकीचं आहे. दोन्ही बाजूकडून विचार केला पाहिजे याबाबत चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT