mp rahul shewale sakal
महाराष्ट्र बातम्या

MP Rahul Shewale : उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या सरकारबद्दल असंतोष असल्याने आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर जाण्याची विनंती केली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नागपूर - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या सरकारबद्दल असंतोष असल्याने आम्ही सर्व खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भाजपबरोबर जाण्याची विनंती केली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला सर्व शिवसैनिक कंटाळले होते; पण, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे कोणालाच भेटत नव्हते.

शिवसैनिकांना विचारविनिमयासाठी बैठक हवी होती; परंतु, उद्धव ठाकरे यांनी त्यांना कधीच भेटण्यासाठी वेळ दिली नाही, असा दावा खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून या सुनावणीत करण्यात आला.

शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोरील सुनावणीत खासदार शेवाळे यांची आज उलटतपासणी घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला.

त्यांनी आपला पक्ष आणि पक्षाचे कार्यकर्ते यांना पणाला लावले, असा दावा ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. त्याचबरोबर शिंदे यांना देण्यात आलेले मुख्यनेतेपदही बेकायदेशीर असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. मात्र, हे दोन्ही दावे खासदार शेवाळे यांनी सुनावणीत फेटाळून लावले आहेत.

तब्बल चार तास झालेल्या या सुनावणीत शिंदे गटाकडून १९९८ ची शिवसेनेची घटना कागदपत्रांबरोबर जोडली. याला ठाकरे गटाने आक्षेप घेतला. शिंदे गटाच्या वकिलांनी २३ जून २०१८ ला झालेल्या शिवसेनेच्या प्रातिनिधिक सभेवरच बोट ठेवले.

आपल्या साक्षीत ही सभाच झाली नसल्याचा दावा शेवाळे यांनी केला. याच सभेत शिंदे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याने ठाकरे गटाच्या वकिलांनी याच दिशेने प्रश्न विचारत शेवाळे यांना अडचणीत टाकण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Maharashtra Rain : डीप डिप्रेशन वादळी स्थिती; अल् निनोला भेदून महाराष्ट्रात जोरदार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज आला समोर

Student Protest: विद्यार्थी, शेतकरी आंदोलनाची तयारी; ‘सीजेपी’ आणि संयुक्त किसान मोर्चा सरकारविरुद्ध आक्रमक

ब्रेकिंग! मोहोळ तालुक्यातील चिंचोळी ‘एमआयडीसी’त बनावट दारूची फॅक्टरी; कारवाई संपायला लागले १२ तास; ‘एक्साईज’च्या अधीक्षक म्हणाल्या, १५ वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई

Commonwealth Games 2026: नाशिकच्या दिलीप गावितला 'सुवर्ण'; Goosebumps आणणारा Video! २ रौप्यपदकांसह भारताने सहाव्या दिवशी पक्की केली ६ पदकं

WHO IS DILIP GAVIT? ५ वर्षांचा असताना झाडावरून पडला अन् हात गमावला... शेतमजूराच्या पोरानं राष्ट्रकुल स्पर्धेत 'सुवर्ण'अध्याय लिहिला; संघर्षमय कहाणी

SCROLL FOR NEXT