Uddhav Thackeray to women Shiv Sainiks eknath shinde shiv sena rebel mla mumbai  Sakal
महाराष्ट्र बातम्या

गद्दारांना भुईसपाट करा; उद्धव ठाकरे यांचे महिला शिवसैनिकांना आवाहन

‘‘काय झाडी...काय ईडी...आनंदात आहेत...ईडीच्या छाप्याचा धाक दाखवून त्यांना इथून घेऊन गेले. आता काय होते ते त्यांना यापुढे कळेलच...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘भाजपला शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढवायच आहे. नुसती शिवसेना फोडा नाही तर शिवसेना संपवा हा त्यांचा डाव आहे. त्यासाठी हा दाढीवाला चेहरा पुढे केला आहे. काल त्यांच्या पुढ्यातून माईक खेचला, हे त्यांना देखील कळाले नाही. आज माईक खेचलाय उद्या काय खेचतील ते बघा,’’ असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. कोणत्याही निवडणुका येऊ द्या, त्यांना भुईसपाट करा,’’ असे आवाहन त्यांनी महिला शिवसैनिकांना केले. शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महिला जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ते म्हणाले, ‘‘काय झाडी...काय ईडी...आनंदात आहेत...ईडीच्या छाप्याचा धाक दाखवून त्यांना इथून घेऊन गेले. आता काय होते ते त्यांना यापुढे कळेलच, असेही ते म्हणाले.

महिला शिवसैनिकांशी संवाद साधताना ५० टक्के आरक्षणापेक्षा गेल्या वेळेस १०० टक्के महिलांना उमेदवारी दिली असती तर कोणी हरामखोरी केलीच नसती. तुम्हा महिला शिवसैनिकांना आजपर्यंत काहीच दिले नाही अशी कबुली देत यापुढे पहिला मान महिलांनाच असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ‘‘तुम्हाला बघून मला हत्तीपेक्षा हजारो वाघांचे बळ आले आहे. पुन्हा एकदा तेजाकडे वाटचाल करूयात. तुम्ही या राजकारणाकडे लक्ष देऊ नका, त्याला तोंड द्यायला मी सज्ज आहे. तुम्ही निवडणुकांकडे लक्ष ठेवा. या निवडणुका आपल्याला जिंकायच्याच आहेत. तुम्हाला या गद्दारांच्या विरोधातील रागाचा निखारा फुलवायचा आहे,’’ असे ते म्हणाले.

महिलांना अश्रू अनावर

उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना अनेक महिला पदाधिकाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते. ठाकरे म्हणाले, की बहुतेक जणींच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. मी असा मध्ये उभा आहे, एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातले विकृत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंतांच्या डोळ्यातले अश्रू. यामधून मला मार्ग काढायचा आहे.

‘नव्या जोमाने शिवसेना उभी करणार’

हिंगोली : ‘‘शिवसेनेतून कोण गेले याची आता पर्वा नाही. तुमच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार आहे. लवकरच शिवसैनिकांच्या भेटीसाठी येणार आहे,’’ असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांना सांगितले.

शिवसेनेच्या येथील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘ज्या लोकांना आपण काही दिले ते सर्व सोडून गेले. मात्र, ज्यांनी आपल्याला दिले ते मात्र सोबत राहिले आहेत. आता मला कशाचीही चिंता नाही. तुमच्या सर्वांच्या साथीने पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करणार आहे. त्यासाठी जिल्हा कार्यकारिणीची बैठक मुंबई येथे होणार आहे. त्यानंतर मी हिंगोलीत येणार असून, तुमची सर्वांची भेट घेणार आहे. आता पुन्हा उभा राहिलो असून, कुठल्याही परिस्थितीत लढणार आहे.’’

शिवसेना बळकट करणार असून पुढील दोन ते तीन दिवसांत जिल्हाप्रमुखांची निवड होणार आहे.

- आनंदराव जाधव, हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT