Devendra Fadnavis esakal
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : तिथं जा नाश्ता वगैरे करा अन्... उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी अमित शाहांना फडणवीस काय म्हणाले होते?

फडणवीस म्हणाले की, मी अमित शाहांना मातोश्रीत येण्यास सांगितलं. त्यावर त्यांनी नवीन कुठलाच इश्यू ओपन करु नका, असं म्हटलं. मी म्हटलं, नवीन कुठलाही मुद्दा उपस्थित होणार नाही. फक्त जायचं नाश्ता करायचा आणि दहा मिनिटं बोलायचं, एवढंच. त्यावरुन अमित शाह मातोश्रीवर गेले.

संतोष कानडे

Amit Shah Meet Uddhav Thackeray : विधानसभा निवडणूक २०१९च्या पूर्वी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याचे वेगवेगळे व्हर्जन समोर येत असतात. ठाकरेंनी पुन्हा एकदा एक नवीन मुद्दा उपस्थित करत, जी काही बोलणी झाली त्याचं एक पत्र तयार करुन मंत्रालयात होर्डिंग लावण्याबद्दल चर्चा झाल्याचं सांगितलं.

२०१९ ला नेमकी काय चर्चा झाली, यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ते 'टीव्ही ९ मराठी'शी बोलत होते. उद्धव ठाकरेंना उद्देशून फडणवीसांनी ते भ्रमिष्ट झालेत किंवा खोटं बोलत आहेत, असं म्हणत हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये आमच्या युतीबाबत सातत्याने चर्चा झाल्यानंतर एकेदिवशी उद्धव ठाकरे म्हणाले- आम्हाला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद हवंय. त्यावर मी पक्षाचे वरिष्ठ नेतेच याबाबत काय ते ठरवतील, असं सांगितलं.

''मी यासंदर्भात अमित शाह यांच्याशी चर्चा केली, ते अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद मागत आहेत. परंतु अमित शाहांनी तसं त्यांना देता येणार नाही, असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी यापुढे बोलणी करायची नाही, असं म्हटलं. ''

फडणवीसांनी पुढे सांगितलं, तीन दिवसांनी ठाकरेंकडून माझ्याकडे एक मध्यस्थ आला आणि पुन्हा बोलणी करायचं म्हणून सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आम्ही पुन्हा बसलो. त्या बैठकीत त्यांनी पालघरची जागा, मंत्रिमंडळात जास्त खाती आणि चांगली खाती मागितली. परंतु अमित शाहांनी मातोश्रीवर यावं, अशी अट त्यांनी घातली.

फडणवीस म्हणाले की, मी अमित शाहांना मातोश्रीत येण्यास सांगितलं. त्यावर त्यांनी नवीन कुठलाच इश्यू ओपन करु नका, असं म्हटलं. मी म्हटलं, नवीन कुठलाही मुद्दा उपस्थित होणार नाही. फक्त जायचं नाश्ता करायचा आणि दहा मिनिटं बोलायचं, एवढंच. त्यावरुन अमित शाह मातोश्रीवर आले.

फडणवीसांनी पुढे सांगितलं की, उद्धव ठाकरेंना त्यांच्या मनातलं बोलायचं होतं.. ते मला म्हणाले की, मी एवढं विरोधात बोललोय... मला यू टर्न घ्यावा लागणार आहे. माझ्या शिवसैनिकांना काय वाटेल? त्यांनाही काहीतरी मिळालंय, असं वाटलं पाहिजे. चांगली मंत्रिपदं आणि जास्त मंत्रिपद मिळाली पाहिजेत. तसंच ठरलं आणि मी एकट्यानेच पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.. त्या पत्रकार परिषदेत कुठलीही प्रश्नोत्तरे झाली नाहीत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT