Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा उद्धव ठाकरेच! 'ही' आहेत पाच करणं...

रवींद्र देशमुख

छत्रपती संभाजीनगर - माहाविकास आघाडीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमुठ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तिन्ही पक्षांनी मिळून ही सभा आयोजित केल्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसनचे अनेक नेते, उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटाचे नेते आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. मात्र महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच पुढं जाणार हे आजच्या सभेतून स्पष्ट झालं आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र या सभेसाठी उद्धव ठाकरे उशीरा आले. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते आधीच हजर होते. अर्थातच उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सभास्थळी प्रतीक्षा करावी लागली.

सभेत सर्व नेत्यांनी अगदी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील आपलं भाषण आवरत घेतल्याचं पाहायला मिळालं. या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण या दोघांनी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडे आणि अजित पवार या दोघांनी भाषणं केली. तर अखेरचं मुख्य भाषण उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यामुळे महाविकास आघाडी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच पुढं जातेय, हे स्पष्ट झालं.

तिसरी बाब म्हणजे, सभास्थळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी विशेष आसन लावण्यात आलं होतं. तर इतर सर्व नेत्यांना साध्या खुर्च्या होत्या. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सभेत वेगळं स्थान होतं, हे स्पष्ट झालं.

या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वाधिक वेळ चाललं. उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर थेट हल्ला चढवल्याचं पाहायला मिळालं. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून केवळ केंद्र सरकारवर हल्ला चढवण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना गेल्यामुळे शिंदे गटावर हल्ला चढवला. शिवाय उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाचं कौतुकच केलं. त्यामुळे एकंदरीतच उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचा चेहरा राहणार हे अधोरेखित झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT