RSS on BJP esakal
महाराष्ट्र बातम्या

RSS on BJP : ''संघाची भाजपला गरज...'' आरएसएसच्या टिपण्णीवरुन उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना सल्ला

संघाच्या मुखपत्राध्ये अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. संघाला दहशतवादी संघटना असं म्हणणाऱ्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्याने संघ स्वंयसेवकांची मनं दुखावली आहेत, असंही त्यामध्ये लिहण्यात आलं आहे.

संतोष कानडे

Uddhav Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून भाजपबद्दल जाहीर नाराजी प्रकट करण्यात आलेली असून पक्षाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. तोच मुद्दा धरुन उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे. शिवाय त्यांनी मोदींना एक सल्लादेखील दिला आहे.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सरसंघचालक मोहन भागवत जे बोलले त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींना गांभीर्य आहे का, की त्यांची आरएसएसची गरज संपली? आतातरी पंतप्रधान आणि गृहमंत्री मणिपूरला जाणार आहेत का?

ठाकरे पुढे म्हणाले की, ''अजित पवारांना महायुतीमध्ये घेणं चुकीचं होतं, असं आरएसएसचं मुखपत्र ऑर्गनायझरने म्हटलं आहे. त्यावर भाजपला प्रश्न विचारले पाहिजेत. देशातल्या मतदारांनी तर भाजपला खडे बोल सुनावले आहेत, आतातरी भाजप सुधारणार आहे का? की देशातल्या प्रतिपक्षांना संपवणार आहे?'' असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

दरम्यान, संघाच्या मुखपत्राध्ये अजित पवारांशी युती केल्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला असल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे पुरेसं बहुमत असताना अजित पवारांना सोबत का घेतलं असा प्रश्न या मुखपत्रातून उपस्थित करण्यात आला आहे. संघाला दहशतवादी संघटना असं म्हणणाऱ्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिल्याने संघ स्वंयसेवकांची मनं दुखावली आहेत, असंही त्यामध्ये लिहण्यात आलं आहे.

काय लिहलं आहे मुखपत्रात?

दहशतवादाला सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या आणि हिंदूंचा छळ करणाऱ्या, २६/११ ला RSS की साझीश म्हणणाऱ्या आणि RSS ला दहशतवादी संघटना म्हणणाऱ्या या काँग्रेसजनांना भाजपचे नेते बनवण्यात आले, त्यांनी चूक केली किंवा झाल्याची खेदाची नोंदही केली नाही.. की त्यांना त्यांच्या मालकांनी खोटे बोलण्यास भाग पाडले. यामुळे आरएसएसच्या स्वंयसेवकांची मनं प्रचंड दुखावली आहेत, असं लेखामध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT