Uddhav Thackrey  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: '...अन्यथा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे', अपात्र आमदारांबद्दल उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्याचा दौरा सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

पक्ष मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजपासून राज्याचा दौरा सुरू केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. त्याची सुरूवात दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्याने झाली आहे. यवतमाळ येथील पोहरादेवीच्या दर्शनानंतर दिग्रस येथे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Marathi Tajya Batmya)

यावेळी बोलताना उध्दव ठाकरेंनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर देखील भाष्य केलं आहे. आधी पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवला जातो. हा पायंडा देशासाठी राज्यासाठी वाईट आहे असंही उद्धव ठाकरे म्हणालेत. (Marathi Tajya Batmya)

अपात्र आमदारांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांमध्ये त्यांच्या निकाल दिला आहे. त्या निकालाच्या चौकटीमध्ये अध्यक्षांना अपात्र आमदारांवर निर्णय घ्यावा लागेल, आणि ते घेतील असा आम्हाला विश्वास आहे, जर त्यांनी तसा निर्णय घेतला नाही तर आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.(Marathi Tajya Batmya)

दोन दिवस मंत्रालयात गेले आणि आता विदर्भ दौरा ढोंगीपणा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने केली होती. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचा राहीला नाही. भाजपने आता दुसरं कोणावरही दोषारोप करण्याचं काम सोडावं. पहिले त्यांनी त्यांच्या घरामध्ये जे काही येत आहेत त्यांचा सांभाळ करावा असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank of Baroda: 'बँक ऑफ बडोदा'चा डेटा कसा 'लीक' झाला? ग्राहकांना धोका आहे का? बँकेने दिलं अधिकृत स्पष्टीकरण

Virar Timber Smuggling: विरारमध्ये भाजीपाल्याच्या टेम्पोआडून खैर लाकडाची तस्करी उधळली; वन विभागाची पहाटे धाडसी कारवाई, मुद्देमाल जप्त

Kelghar Ghat Landslide : चालक अजरुद्दीनच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव! केळघर घाटात जेसीबीवरच मोठी दरड कोसळली; महाबळेश्वर-सातारा मार्ग पूर्णपणे ठप्प

Bhima River Farmers: भिमा नदीत पाणी सोडूनही वीज नाही; संतप्त नदीकाठच्या शेतकऱ्यांची ‘आठ तास वीज नसेल तर पाणीही नको’ अशी सोशल मीडियातून हाक

Ganeshotsav Special: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना मध्य रेल्वेची मोठी भेट; सीएसएमटी, एलटीटी, पुणे व दिवाहून तब्बल २४६ गणपती विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT