Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : आरक्षणासाठी मोदींकडे जावे लागेल ; उद्धव ठाकरे यांची भूमिका,मराठा आंदोलकांनी घेतली भेट

‘‘आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने तो रद्द केला. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नाही. यापूर्वी बिहार सरकारने आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र न्यायालयाने तो रद्द केला. कारण आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार लोकसभेला आहेत. त्यामुळे सर्व समाजाच्या नेत्यांना पंतप्रधान मोदींकडे जावे लागेल,’’ अशी भूमिका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मांडली.

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी करत मराठा आंदोलक रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी ‘मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मधील काळात सरकारने आरक्षणाच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलावून एक नाटक करण्याचा प्रयत्न केला होता. मुळात आम्ही अनेकदा याबाबत भूमिका मांडली आहे. ज्यावेळी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मांडण्यात आले, तेव्हाही आम्ही त्याला पाठिंबा दिला होता. आरक्षणाच्या बाबतीत राजकीय नेत्यांच्या भूमिकेपेक्षा, सरकारने सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावे आणि सर्वमान्य तोडगा काढावा. आमचा त्याला पाठिंबा असेल,’’ असे ठाकरेंनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, की ज्यावेळी काही मराठा आंदोलक मला भेटायला आले, तेव्हा मी त्यांना हेच सांगितले, की दोन समाजांना एकमेकांविरोधात लढवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न पूर्ण होऊ देऊ नका. कारण आपण एकाच आईची मुले आहोत, महाराष्ट्राची लेकरे आहोत. त्यामुळे सर्व समाजातील लोकांनी एकत्र या, त्यासाठी माझे खासदार, माझा पक्ष त्यांच्याबरोबर असेल, असेही आश्वासन त्यांनी मराठा आंदोलकांना दिले.

तेव्हा आईवडिलांचे दु:ख कळेल!

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांबाबत विचारले असता ठाकरे म्हणाले, देशमुख यांची अलीकडेच भेट झाली. आमचे यावर बोलणे झाले. या आरोपांवरून कोणत्या पद्धतीचे घृणास्पद काम करणारे लोक सत्तेत बसले आहेत, हे लक्षात येईल. हे सर्व लोक अमानुष आहेत.

ते कुणाचेही कुटुंब बघत नाहीत. दुसऱ्यांच्या मुलांवर घाणेरडे आरोप करून त्यांचे आयुष्य बरबाद करायचा प्रयत्न हे लोक करत आहेत. मात्र, त्यांनाही मुलेबाळे आहेत, हे ते विसरले आहेत. उद्या त्यांच्या मुलाबाळांवर कुणी असे आरोप करून त्यांना घाणेरड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांना आईवडिलांचे दु:ख काय असते, हे कळेल अशा शब्दांत ठाकरे यांनी सुनावले. पूर्वीचा व आताचा भाजप वेगळा आहे. आता भाजप अतिशय घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणारा आहे. मात्र, ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT