Uddhav Thackrey Esakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackrey: शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांवर उद्धव ठाकरे बोलले; म्हणाले, 'हे अत्यंत...'

उद्धव ठाकरे यांची अजित पवार यांच्यावर पहिल्यांदाच केली सडकून टीका

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठी फुट पडली. त्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले, तर बंड केल्यानंतरच्या पहिल्याच सभेमध्ये अजित पवारांनी शरद पवार यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा उल्लेख करत जाहीर सभेत वक्तव्य केलं होतं. पवारांचं वय झाल्याने त्यांनी कुठेतरी थांबायला हवं असं अजित पवारांनी म्हटलं होतं. याच विधानावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.

दैनिक सामनासाठी घेतलेल्या मुलाखतीत खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंनी अजित पवारांनी शरद पवारांना निवृत्त होण्यासंदर्भात दिलेल्या सल्ल्याबद्दल प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले की, 'अजित पवार यांचं अत्यंत वाईट असं ते मत होतं. कारण शेवटी ज्यांच्याकडून आपण सर्वकाही घेतो त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणं हे आपल्या संस्कृतीला शोभा देणारं नाही. नेहमी आपण वडीलधाऱ्यांचा मान, आदर, सन्मान ठेवतो. आणि तो ठेवलाच पाहिजे. वय झालं म्हणजे काय? मग आशीर्वाद कोणाकडून घ्यायचे? हे त्यांचं वक्तव्य मला आवडलं नाही', असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

तर पुढे उध्दव ठाकरे म्हणाले की, 'तुमचं पटत नसेल तर जाहीर सांगा की तुमचं का पटत नाही. या वयातसुद्धा ज्यांनी तुम्हाला सगळं काही दिलं त्यांना तुम्ही आता या पद्धतीने बोलणार हे मला पटलेलं नाही. केवळ अजित पवारच नाही, तर ज्याला कोणाला त्याच्या स्वार्थासाठी जायचं असेल तर स्वार्थासाठी जातोय हे खरं बोलून जावं, कदाचित लोकं स्वीकारतील. पण चार-चार, पाच-पाच वेळा सगळं मिळाल्यानंतर, सगळं जे चांगल्यात चांगलं देता येणं शक्य होतं ते दिल्यानंतरसुद्धा अन्याय झाला हो.म्हणून टाहो फोडून जाणं हे बरोबर नाही. मग त्यात आमच्यातलेसुद्धा गद्दार असतील आणि सगळ्याच पक्षातले गद्दार असतील असंही उध्दव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

'शिवसेनेचे बंडखोर आमदार 'मातोश्री'च्या दारात आले तर..?', उध्दव ठाकरेंचं रोखठोक उत्तर

'जसे फुटीर पवारांच्या दारात गेले. नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट दिले. पवारांचे फोटो लावून मतं मागत आहेत किंवा चर्चा घडवत आहेत. अशा प्रकारे शिवसेनेतले फुटीर जर तुमच्या दारात आले तर असा प्रश्न संजय राऊत यांनी केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'त्यांची हिंमतच नाही येण्याची. आले तर वगैरेचा विषयच नाही. येऊच शकत नाहीत ते.त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहितेय आणि शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे, हे त्यांना माहिती आहे', असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT