Shivsena-VBA Alliance Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena-VBA Alliance: मोठी बातमी! ठाकरे गट अन् वंचितच्या युतीची अधिकृत घोषणा

बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर राज्याच्या राजकारणात नवे पर्व

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असणाऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न आज समोर आला आहे. बाळासाहेबांच्या जयंतीच्या मुहूर्तावर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची आज युती झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आणि वंचितच्या वतीने युतीची घोषणा करण्यात आली आहेत. पत्रकार परिषद घेत दोन्ही पक्षांच्या प्रमुखांनी ही घोषणा केली आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पुढील वाटचालीसाठी एकत्र आलो आहोत. प्रथम देश हीत महत्वाचं आहे. तर यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीची युती फक्त शिवसेनेच्या ठाकरे गटाशी आहे. महाविकास आघाडीशी ही युती नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

दोन्ही शक्तींना एकत्र येण्याची गरज होती. राज्यात भांडवलशाहीचं राजकारण सुरू आहे. तर महाराष्ट्रात महत्वाचे मुद्दे मागे पडले असल्याचंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत. लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. जिंकणं राजकारण्याच्या हातात नाही पण उमेदवारी देणं त्यांच्या हातात आहे असं आंबेडकर म्हणाले आहेत.

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत शेतातील भांडण नाहीत तर त्यांच्यासोबत मुद्याची भांडण आहेत. असं म्हणतं शरद पवार आमच्यासोबत येतील अशी अपेक्षा बाळगतो असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे. मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. कारण सध्या ही युती फक्त शिवसेनेसोबतच असून महाविकास आघाडीचं नंतर बघू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT