Ujjani Dam sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरण 100 टक्के भरलेले! शेतीसाठी सुटणार 15 जानेवारीनंतर पाणी; यंदा उन्हाळ्यात शेतकऱ्यांना 3 आवर्तने, ‘या’ 3 उपसा सिंचन योजना जूनपर्यंत पूर्ण होणार

उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. उजनीतील उपलब्ध पाण्याचे या वर्षाचे अंतिम नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरणार आहे. पण, शेतीसाठी १५ जानेवारीनंतर उजनी धरणातून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी झाल्यामुळे यंदा शेतीसाठी उन्हाळ्यात एक वाढीव आवर्तन मिळणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण सध्या १०० टक्के भरलेले आहे. उजनीतील उपलब्ध पाण्याचे या वर्षाचे अंतिम नियोजन कालवा सल्लागार समितीत ठरणार आहे. पण, शेतीसाठी १५ जानेवारीनंतर उजनी धरणातून पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी समांतर जलवाहिनी झाल्यामुळे यंदा शेतीसाठी उन्हाळ्यात एक वाढीव आवर्तन मिळणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात यंदा दोन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. उजनी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून जिल्ह्यातील एक लाख ५३ हजार हेक्टर क्षेत्राला थेट पाणी पोचते. अतिवृष्टी व महापुरामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांमधून चांगल्या उत्पन्नाची आशा आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना १५ जानेवारी ते १५ जून या सहा महिन्यांत तीन वेळा उजनीतून पाणी सोडले जाणार आहे. याशिवाय भीमा नदीतून देखील दोन आवर्तने सोडले जातील, असे नियोजन करण्यात आले आहे. त्यावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

कालवा सल्लागार समितीत होईल अंतिम निर्णय

शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधी शेतीसाठी पाणी सोडण्यासंदर्भात मागणी करतात. त्यानुसार कालवा सल्लागार समितीची बैठक होते. त्यानंतर बैठकीतील निर्णयानुसार उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. यंदा जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पहिले आवर्तन सोडले जाऊ शकते.

- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाक्षक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ११७.२३ टीएमसी

  • उपयुक्त साठा

  • ५३.५७ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • १००

  • शेतीसाठी पहिले आवर्तन

  • १५ जानेवारीनंतर

एकरूख, शिरापूर, बार्शी उपसा सिंचन योजना जूनपर्यंत पूर्ण

एकरूख, शिरापूर व बार्शी उपसा सिंचन योजनांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी उजनीत २.५९ टीएमसी पाणी आरक्षित असून त्यातून २१ हजार ३०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तसेच एकरूख योजनेसाठी ३.१६ टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले असून त्यातून दहा हजार २२४ हेक्टर आणि शिरापूर उपसा सिंचन योजनेमुळे त्या भागातील १४ हजार २०० हेक्टर क्षेत्राला १.७३ टीएमसी पाणी मिळणार आहे. या योजनांचे कालवे पूर्ण झाले असून आता पाइपलाइन, पंप हाउसची कामे सुरू आहेत. जून २०२६ पर्यंत तिन्ही योजना पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Schemes : शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना; दरमहा मिळणार 3000 रुपये! जाणून घ्या अर्ज कसा करायचा?

Success Story: शेतमजुराच्या मुलाची ‘एअर फोर्स’मध्ये निवड; अभिषेक सास्तेची प्रेरणादायी कहाणी

Kolhapur Crime : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने आई-वडिलांना बेदम मारहाण; मुलाने डोक्यात घातला लोखंडी बार

Akola Accident: जाफराबाद मार्गावर भीषण अपघात; पिकअप-बस धडकेत दोन महिला मजूर ठार, सहा जखमी

IND vs UAE U19 : भारताच्या ४३३ धावा! वैभव सूर्यवंशीच्या १७१ धावा U-19 रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवल्या जाणार नाहीत; जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT