'उजनी' रेंगाळतेय 60-62 टक्‍क्‍यांवरच ! तीन जिल्ह्यांना लागली धाकधूक Canva
महाराष्ट्र बातम्या

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळाशी गेला आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून १० मेपासून उजनी धरणातून भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी नदी काठावरील वीज बंद ठेवली जाणार आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठी केवळ दोन तासच वीज सुरू ठेवली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळाशी गेला आहे. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा म्हणून १० मेपासून उजनी धरणातून भीमा नदीतून पाणी सोडले जाणार आहे. त्यावेळी नदी काठावरील वीज बंद ठेवली जाणार आहे, पण पिण्याच्या पाण्यासाठी केवळ दोन तासच वीज सुरू ठेवली जाणार आहे. कडक उन्हामुळे या आवर्तनासाठी उजनीतून साडेपाच टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.

सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सध्या पाच दिवसाआड करण्यात आला आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी काही दिवस पुरले, पण आता २० मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा बंधाऱ्यात आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरासाठी उजनीतून १० मेपासून पाणी सोडावे लागणार आहे. आता उजनीतून सोलापूर शहरासाठी सोडले जणारे हे शेवटचे आवर्तन असणार आहे, कारण त्यानंतर पाऊस येईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

धरण सध्या मायनस ४४ टक्के असून सोलापूर शहरासाठी नदीतून पाणी सोडल्यानंतर साधारणत: ११ टीएमसी आणखी धरण खाली जाणार आहे. त्याशिवाय बाष्पीभवन, जलाशयातून विविध योजनांसाठी होणारा उपसा, यामुळे जूनमध्येच धरण उणे ६६ टक्क्यांवर जाणार आहे. त्यामुळे शहरासाठी सोडलेले पाणी आता महापालिकेला २० जुलैपर्यंत (पाऊस पडेपर्यंत) पुरवावेच लागणार आहे. महापालिकेने धरणात तिबार पंपिंगचीही तयारी केली असून पुढील आठवड्यात ती यंत्रणा कार्यान्वित होईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी दिली.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण मृतसाठा : ४०.३० टीएमसी

  • जिवंत साठा : उणे २३.३८ टीएमसी

  • एकूण पाणीसाठा : उणे ४४ टक्के

नाशिकच्या बडगुजर कंपनीला ठेका

उजनी धरण तळ गाठत असल्याने सोलापूर महापालिकेने तिबार पंपिंगची तयारी सुरू केली आहे. नाशिकच्या बडगुजर कंपनीला तिबार पंपिंगचा ठेका मिळाला असून तिबार पंपिंगसाठी दीड कोटींचा खर्च अपेक्षित आहे. १३५ एचपीचे तीन पंप धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी आणले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला ५० ते ६० लाख रुपयांचे ज्यादा वीजबिल भरावे लागणार आहे.

महापालिकेचे पत्र, ५ नको, १० मेपासून सोडा पाणी

औज बंधाऱ्यात आणखी १५ दिवस पुरेल इतके पाणी आहे. तरीपण, ५ मेपासून उजनीतून पाणी सोडल्यास साधारणत: १६ मेपर्यंत औज बंधाऱ्यात पोचेल म्हणून जलसंपदा विभागाने रविवारपासून (ता. ५) सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. पण, शहराचा पाणीपुरवठा ५ दिवसाआड केल्याने बंधाऱ्यातील पाणी आणखी काही दिवस पुरणार असल्याने १० मेपासून धरणातून पाणी सोडावे, असे पत्र महापालिकेने जलसंपदा विभागाला दिले. जेणेकरून पुढे पावसाळा लांबला तरीदेखील २० जुलैपर्यंत हे पाणी शहरासाठी पुरेल हा त्यामागील हेतू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya: रामनवमीला रामललाचा 'सूर्याभिषेक'! दुपारी १२ वाजता सूर्यकिरणे कपाळावर चमकणार; शास्त्र आणि तंत्रज्ञानाचा अद्भूत सोहळा!

Mahavitaran: महावितरणच्या वीज सेवांचा डिजिटल धमाका! बिल पाहणे, भरने आणि तक्रार नोंदवणे आता व्हॉट्सॲपवर शक्य

Jalna News: रुग्णवाहिकांच्या इंधनाचा उद्‍भवणार प्रश्न; पेट्रोल पंपधारकांना क्रेडिटवर डिझेल पेट्रोल बंद झाल्याने उधारी बंद होणार

Ashok Kharat Fraud : अशोक खरात की लक्ष्मण? नाशिकच्या भोंदूबाबाचा खरा चेहरा समोर; दहावी मार्कशीटमधील 'या' आकड्यांनी उडाली खळबळ, कसं बदललं नाव?

Ashish Shelar: ‘मराठी’साठी चित्रनाट्यगृह उभारणार, सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांची घोषणा

SCROLL FOR NEXT