महाराष्ट्र बातम्या

Accident : नवरदेवाच्या गाडीने नाचणाऱ्या 12 वऱ्हाडींना चिरडलं; मुंबईजवळच्या घटनेने खळबळ

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः नवरदेवाच्या गाडीसमोर वऱ्हाडी नाचत होते. थार गाडीसमोर नाचणाऱ्यांना चक्क त्याच गाडीने चिरडले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली.

उल्हासनगरच्या शांती नगरमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये १२ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. त्यातील २ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

ठाण्यातल्या उल्हासनगरमध्ये एक लग्नसमारंभ पार पडत होता. सगळं उत्साहाचं वातावरण होतं. नवरदेव थार गाडीमध्ये होता. नवरदेसामोर वऱ्हाडी मंडळी नाचत होते.

अचानकपणे थार गाडीने पिकअप घेतलं आणि नाचणाऱ्या वऱ्हाडींना चिरडलं. या घटनेत १२ जण जखमी झाले आहेत. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

या घटनेनंतर पोलिसांनी थार गाडी ताब्यात घेतली. नेमका अपघात कसा घडला, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. या घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये बहूतांश महिलांचा समावेश असून गाडी अॅटोमॅटिक असल्याचं सांगितलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT