Ganpat Gaikwad Firing 
महाराष्ट्र बातम्या

Ganpat Gaikwad Firing: भाजप आमदार गणपत गायकवाडला 11 दिवसांची पोलीस कोठडी!

Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राजकारण तापले आहे.

Sandip Kapde

Ganpat Gaikwad Firing: उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे राजकारण तापले आहे. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणात कोर्टाने त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्याच गोळ्या झाडल्या होत्या. गणपत गायकवाड यांनी सहा गोळ्या फायर केल्या होत्या. ह्या सर्व गोळ्या महेश गायकवाड यांना लागल्या. महेश गायकवाड यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. (Crime News)

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्व मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत. गायकवाड तीन वेळा आमदार असून 2009 पासून सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष आमदार राहिले आहेत.

शिवसेना नेते महेश गायकवाड हे माजी नगरसेवक असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. महेश गायकवाड हे उल्हासनगर शिवसेनेचेही प्रमुख आहेत.

नेमकं काय घडलं?

कल्याण पूर्वेतील एका मालमत्तेच्या मालकी हक्कावरून भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू आहे. या मुद्द्यावर 31 जानेवारी रोजी दोन्ही पक्ष आमनेसामने आले होते. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही पक्ष शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगरमधील हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोहोचले होते. (Latest Marathi News)

दरम्यान, दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा वाद झाला आणि वाद इतका वाढला की, भाजप आमदार महेश गायकवाड यांनी गोळीबार केला. या घटनेत महेश गायकवाड याना सहा गोळ्या लागल्या. तर एकजण जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदारासह तिघांना अटक केली आहे. दुसऱ्या पक्षाने आपल्या मुलासोबत गैरवर्तन केले, त्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा भाजप आमदाराने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT