boramani murder

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

वहिनी, पुतण्या-पुतणीचा खून करणारा काका सापडेना! पोलिसांनी मागविला आरोपीच्या मोबाईलचा ‘सीडीआर’; ५ जणांना ४ दिवस पोलिस कोठडी, वाचा...

मयत पतीच्या हिश्श्याच्या जमिनीची वाटणी व हातउसने दिलेले २५ लाख रुपये सतत मागणाऱ्या वहिनीसह तिच्या दोन्ही मुलांना मारणारा दीर शंकर दत्तात्रय मस्के (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) फरार आहे. गुन्ह्यात पाच संशयितांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मयत पतीच्या हिश्श्याच्या जमिनीची वाटणी व हातउसने दिलेले २५ लाख रुपये सतत मागणाऱ्या वहिनीसह तिच्या दोन्ही मुलांना मारणारा दीर शंकर दत्तात्रय मस्के (रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) फरार आहे. गुन्ह्यात पाच संशयितांना सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ८ मेपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी शंकरच्या मोबाईलचा पाच दिवसांचा ‘सीडीआर’ मागविल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

शनिवारी (ता. २) मध्यरात्री दीडच्या सुमारास शंकरने घराच्या टेरेसवर झोपलेल्या वहिनी, पुतण्या व पुतणीला जिवे ठार मारले होते. या गुन्ह्यात मयत गायत्री यांच्या भावाने पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी शंकरची पत्नी राणी, मुलगी दिक्षा, मुलगा धीरज, मेव्हणा सूरज माधवराज मोरे व त्याच्या हॉटेलमधील कामगार सचिन शिवाजी वाघमारे यांना अटक केली. सोमवारी (ता. ४) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. अद्याप संशयित आरोपींनी ‘आपला या गुन्ह्यात सहभाग नाही’ अशीच भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर आता हत्याकांडापूर्वी संशयित आरोपी शंकर मस्के कोणाकोणाच्या संपर्कात होता, घटनेच्या दिवशी तो कोणाकोणाशी बोलला, त्याला कोणाचे कॉल आले होते, या बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. त्यासाठी पोलिसांनी त्याच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स मागविले आहेत. पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे तपास करीत आहेत.

शंकर मस्केच्या शोधासाठी ५ पथके

गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार शंकर मस्के याने वहिनी गायत्री (वय ४०), पुतणी प्रियंका (वय १७) व पुतण्या शिवराज (वय १५) यांच्यावर तलवारीने वार करून जागीच ठार केले. गुन्ह्यातील पाच संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले आहे, पण शंकर अजूनही सापडलेला नाही. त्याच्या शोधासाठी सोलापूर तालुका पोलिस ठाण्याची तीन तर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके रवाना झाली आहेत. तो परराज्यात असून सतत जागा बदलत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ARG vs Austria : लिओनेल मेस्सीचा विश्वविक्रमी गोल पाहिलात का? ज्याने अर्जेंटिनाला Fifa World Cup च्या पुढील फेरीत पोहोचवले Video Viral

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

SCROLL FOR NEXT