Arun Gawli News esakal
महाराष्ट्र बातम्या

Arun Gawli : अरुण गवळीने सांगितले ज्ञानेश्वरीतील गुढीचे महत्त्व; सोशल मीडियात पोस्ट चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः अंडरवर्ड डॉन अरुण गवळी याने मराठी नूतन वर्षानिमित्त गुढी उभारली आहे. गवळीने सोशल मीडियावर गुढीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने ज्ञानेश्वरीतील ओव्यांचं विवेचन केलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये गुढीचा उल्लेख चार वेळा आला असून त्या प्रत्येक ओवीचं निरुपण गवळीने केलंय.

अरुण गवळीची पोस्ट जशास तशी

श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये गुढी या शब्दाला चार वेळा स्थान दिले आहे. या चारही ओव्या वेगवेगळ्या अध्यायांत आहेत. साहजिकच श्रीमाऊलींनी या शब्दाची योजना त्यांच्या समृद्ध साहित्यात केल्याने त्याला सौभाग्य प्राप्त झाले आहे. पण नेमका त्या शब्दाची योजना कशी केली आहे हे आपण बघुया. पहिले अध्याय चार मधील उल्लेख पाहू...

अधर्माची अवधी तोडी | दोषांची लिहिली फाडी |

सज्जनांकरवी गुढी | सुखाची उभवी ||

भक्तांचा कैवार घेऊन भगवंत जेव्हा सगुण साकार होऊन अवतरतो तेव्हा त्याच्याकरवी संपूर्ण अज्ञानाचा अंधकार नाहीसा होतो. जगताचा पालन करता जगन्नाथ इथे अधर्माचा शेवट करितो, पापांचा जमाखर्च फाडून टाकितो आणि साधुपुरुषांच्या करवी भक्तीचा प्रसार करवून सर्वत्र सुखाच्या गुढ्या उभारतो. इथे गुढी हा शब्द #सौख्यप्राप्ती आणि धर्माची विजयपताका म्हणून योजला आहे. दुसरा उल्लेख अध्याय सहामध्ये आहे.

हेही वाचाः झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

ऐके संन्यासी तोचि योगी | ऐसी एकवाक्यतेची जगी |

गुढी उभविली अनेगी | शास्त्रांतरी ||

संन्यास आणि योग यातील मूळ प्राप्तीचा उद्देश हा भिन्न नसून एकच आहे असे भगवान श्रीकृष्ण इथे अर्जुनाला सांगतात. संन्यासी आणि योगी हे दोघेही एकाच परमतत्वाकडे मार्गस्थ असतात. आणि हे नुसते बोलणे नाही तर, या एकवाक्यतेचा झेंडा शास्त्रांच्या आधारे अनेक साधकांनी लोकांत मिरविला आहे; हे सत्य किती प्रस्तुत आहे हे सांगताना इथे गुढी उभविली अनेगी म्हणत श्रीमहाराज आम्हाला पुन:श्च एकदा विजयाची प्राप्तीची संज्ञा म्हणून गुढी शब्दाची योजना करतात. अध्याय अकरा मध्ये भगवंत आपले अर्जुनाप्रती असलेले उत्कट प्रेम प्रगट करताना म्हणतात...

ऐसी काय नेणो तुझिये आवडी | जाहली प्रसन्नता आमुची वेडी |

म्हणोनि गौप्याची गुढी | उभविली जगी ||

अर्जुना तुझें अत्यंत प्रेम लागून माझी प्रसन्नता वेडी झाली हे मलाच समजत नाही, म्हणून सर्वांपासून गुप्त असलेले हे विश्वरूप ज्याची जगांत ध्वजा गुढी उभारली. ते तुझ्यासाठी आम्ही प्रगट केले. इथे देवांनी विश्वरूपाच्या संबंधित अमर्याद, अचिंत्य आणि परमोच्च असे विधान प्रस्तुत करताना गुढी या शब्दाची योजना केली आहे. ज्यामध्ये गुढी हि सर्वोच्चतेचे_प्रतिक म्हंटल्या गेली आहे.

म्हणजे चारपैकी तीन ओव्यांचा उल्लेख आपण जर बघितला तर गुढी हा शब्दप्रयोग अत्यंत सौभाग्यदायक आहे असे दिसून येते. शेवट अध्याय १४ मध्ये तर राजा धृतराष्ट्र संजयाला विचारताना

माझी अवसरे ते फेडी | विजयाची सांगे गुढी |

या युद्धांत विजयाची पताका गुढी कोणाकडे उभारली जाईल असे विचारतो, आता इथे गुढी म्हणजे विजयाचे प्रतिक किंवा निशाणी आहे.

ही आजची चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच नववर्षाची पहिली तिथी आपण श्रीज्ञानेश्वरीच्या ह्या चार ओव्यांनी समृद्ध करुया, ही गुढी सदैव आम्हाला भक्ती आणि समर्पणाची विजयपताका म्हणून उभारता यावी हीच या सकल संताच्या चरणी प्रार्थना..

असं सांगत अरुण गवळीने सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु त्याच्या अशा पोस्टमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT