Prakash Ambedkar and Narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: मोदी सध्या 'बावर्जी'च्या भूमिकेत; समान नागरी कायद्यावरून आंबेडकरांची टीका

सकाळ डिजिटल टीम

अकोला : नवीन संसद भवनाच्या उद्‍घाटनापूर्वी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. आता कायद्यावर चर्चा घडवून आणण्यास सुरुवात केली आहे. विधी आयोगानेही त्यावर सूचना मागविल्या आहेत. मात्र, ज्या कायद्याबाबत चर्चा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे, त्या कायद्याचा मसुदाच तयार नाही. आधी तो जाहीर करा, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंमसेवक संघाला (आरएसएस) केले आहे.

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधी आयोगाने समान नागरी कायद्यावर चर्चा करण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाबाबत त्यांनी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. कायद्याचा मसुदाच तयार नाही तर चर्चा कशावर करावी, प्रतिक्रिया कशावर द्याव्यात, असा प्रती प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कायद्याबाबत घाईघाईत निर्णय घेण्यामागील कारण म्हणजे सध्या भाजपकडे निवडणुकीसाठी कोणताही मुद्दा उरला नाही. त्यामुळे समान नागरी कायद्यावर चर्चा सुरू करण्यात आली आहे. हिंदू समाजातच भांडणे लावण्याचा प्रकार सध्या हिंदूंचे ठेकेदार म्हणविणाऱ्या आरएसएसकडून सुरू असल्याचा आरोपही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. ज्या कायद्यावर केंद्र सरकार चर्चा घडवून आणू पाहते आहे, त्या कायद्या मसुदा आधी प्रसिद्ध करावा, असे आव्हानच त्यांनी दिले.

पंतप्रधान मोदी झाले ‘बावर्जी’

समान नागरी कायद्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान हे सध्या ‘बावर्जी’च्या भूमिकेत वागत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांना घरात काय आहे, गॅस आहे किंवा नाही, धान्य आहे किंवा नाही याचीच माहिती नाही आणि ते स्वयंपाक करायला निघाले आहेत. त्यांचे घरच खाली असल्याचे सांगून, आंबेडकर यांनी समान नागरी कायद्याच्या मसुद्यावरून मोदींना लक्ष्य केले.

कोणती विवाहपद्धत स्वीकारणार, ते स्पष्ट करा!

संविधानावरील चर्चेत समान नागरी कायद्याबाबत बाबासाहेबांनी जबाबदारी घेतली होती. तेव्हा हिंदूंच्या विवाह पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. समान नागरी कायदा करायचा म्हणजे, सध्या प्रचलीत असलेल्या विवाह पद्धतीपैकी एक स्वीकारावी लागेल. ब्राह्मण आणि क्षत्रियांची होम आणि फेरे घेवून होणारा विवाह की इतरांचा आंतरपाट धरून होणारा विवाह यापैकी कोणत्या विवाह पद्धतीचा स्वीकार करणार आहे, ते आधी भाजप व आरएसएसने स्पष्ट करावे, असे आव्हानच आंबेडकर यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT